Thursday, April 25, 2024

नागा चैतन्यने समंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर ज्युबिली हिल्समध्ये खरेदी केले नवीन घर?

दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या घोषणेने संपून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि त्यांचे चाहते हादरली आहे. त्यानंतर या दोन कलाकारांच्या घटस्फोटाबाबत अनेक प्रकारची माहिती समोर येत आहेत. ’फॅमिली मॅन २’ स्टार समंथा आणि नागा चैतन्य यांनी २ ऑक्टोबर यादिवशी घटस्फोटाची घोषणा केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या माजी-स्टार जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी ब्रेकअप केले. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक माहिती समोर येत असल्याने घटस्फोटाच्या कारणांबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटस्फोटामागे अभिनेत्रीचा स्टायलिस्ट मित्र प्रीतम जुकळकरसोबत वाढती मैत्री हे कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ती आई बनत नसल्याच्याही चर्चा होत आहे. दरम्यान, समंथाचा गर्भपात झाल्याचीही माहिती आली होती. 

https://www.instagram.com/p/CLR6ZylLv-F/?utm_source=ig_web_copy_link

समंथाने यापूर्वी सोशल मीडियाद्वारे या सर्व बातम्यांचा जोरदार विरोध केला. एवढेच नाही, अलीकडेच असे वृत्त आले होते की, समंथाने पती नागा चैतन्यकडून घटस्फोटासाठी २०० कोटी रुपये देखील नाकारले. दरम्यान, आणखी एक मोठी माहिती समोर आली की, समंथा घटस्फोटानंतर तिने खरेदी केलेल्याच घरात राहत आहे. हे घर समंथा आणि नागा चैतन्याचे होते. ज्यात दोघेही त्यांच्या लग्नापासून एकत्र राहत होते. घटस्फोटाच्या घोषणेपासून नागा चैतन्य वडील नागार्जुन यांच्यासोबत राहत आहे, तर समंथा या घरात राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दरम्यान नागा चैतन्यने ज्युबिली हिल्समध्ये नवीन घर घेतले असून, सध्या तिथे रिनोव्हेशनचे काम चालू आहे.

https://www.instagram.com/p/CDsmYEpBt4R/?utm_source=ig_web_copy_link

घटस्फोटाच्या घोषणेच्या काही दिवस आधीही असे वृत्त आले होते की, नागा चैतन्य आपले घर सोडून हॉटेलमध्ये थांबला आहे. तर समंथा देखील तिच्या घरापासून दूर होती. या काळात ती चेन्नईलाही गेली आणि तिरुपतीचेही दर्शन घेतले. समंथा मुंबईत स्वतःसाठी नवीन घर शोधत आहे. जेणेकरून ती हिंदी चित्रपट इंडस्ट्रीशी संबंधित प्रोजेक्टर लक्ष केंद्रित करू शकते.

आता हे एक्स कपल त्यांच्या व्यावसायिक कमिटमेंट्समध्ये व्यस्त झाले आहेत. समंथा ज्युनियर एनटीआरच्या क्वीझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या तेलुगु वर्जनमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. तर नागा चैतन्य त्याचा भाऊ अखिल अक्किनेनीच्या ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. समंथा आणि चैतन्यने २०१७ मध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…

बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास

अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, “राज्य सरकारचा ‘हा’ नियम थिएटर व्यावसायाच्या मुळावर घाव घालणारा”

हे देखील वाचा