Friday, April 19, 2024

आनंदाची बातमी! राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रवींंद्र घेऊन येतेय ‘हा’ अभंग

तरूण पिढीतील युथ आयकॉन म्हणुन ओळखली जाणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रतिभावंत युवा पार्श्वगायिका म्हणजे सावनी रवीन्द्र हिचा सोशल मिडियावर अनेक चाहते आहेत. मराठी, हिंदी, तमिळ, तेलगु, बंगाली, कोंकणी यासारख्या अनेक भारतीय भाषांमध्ये तिची गाणी लोकप्रिय आहेत. भारतरत्न लता मंगेशकर, भावगंधर्व पं. हृदयनाथजी मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांचे तिला नेहमीच आशिर्वाद लाभले आहेत. मराठीतील सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून गेल्या वर्षी 67 व्या राष्ट्रीय पुरस्काराने तिला गौरविण्यात आले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तीनंतर प्रथमच सावनी रवीन्द्र (Savaniee Ravindrra) आपल्या जन्मगावी रत्नागिरी येथे परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या 120 व्या जन्मतिथी उत्सवानिमित्त होणाऱ्या महोत्सवात गायनसेवा सादर करणार आहे. महोत्सव मंगळवार (दि. 20 डिसेंबर 2022)ला, रात्री 9.30वाजता घन अमृताचा हा भक्तीगीतांचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.

या कार्यक्रमात संतवाड.मय व अनेक लोकप्रिय भक्तीगीतांचा समावेश असणार आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या 120व्या जन्मतिथी उत्सवाचे औचित्य साधून स्वामी स्वरूपानंदाचा एक अभंग सावनी रवीन्द्र आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत आहे. या कार्यक्रमात त्या अभंगाचाही समावेश असणार आहे. सुरेल नामवंत वाद्यवृंदासह सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे निरूपण सुप्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका दिप्ती भागवत या करणार आहेत.

सावनीच्या आवाजाने मराठी प्रेक्षक कायमच मंत्रमुग्ध होत आले आहे. सावनीचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे. ती आपले फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून कायमच चाहत्याचे लक्ष वेधत असते. अलिकडेच सावनीने साेशल मीडियाच्या माध्यामातून आई झाल्याची गाेड बातमी चाहत्यांसाेबत शेअर केली हाेती.(National Award winner Savni Ravindra abhanga presented to her fans)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“शिवसेनेच्या झेंड्यात…”, शक्तिमानची दीपिका पदुकाेणच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर संतप्त प्रतिक्रिया

अरे व्वा! टीना आणि राहुल पुन्हा एकत्र, सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

हे देखील वाचा