‘माहिती नाही पुन्हा मुंबईला कधी जाईल’, चित्रपटाची शूटिंग संपवून गावाला गेलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचे वक्तव्य

Nawazuddin siddiqui return to his home town, saya don't know when he return to mumbai


कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. यातच अनेक चित्रपटांची शूटिंग देखील बंद आहे. त्यामुळे अनेक कलाकार सध्या त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी देखील त्याच्या गावी बुधानाला गेला आहे. जिथे त्याची आई आणि त्याचे कुटुंब आहे. मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन झाले होते, तेव्हा देखील तो त्याच्या गावालाच होता.

नवाजुद्दीनचे त्याच्या गावाला घर आणि शेती आहे. त्यामुळे तो त्याच्या कामातून वेळ मिळाला की, गावाला जाऊन शेतीकडे लक्ष देत असतो. मागच्या लॉकडाऊनमध्ये त्याने गावाला शेती केली होती. पण परिस्थिती जेव्हा स्थिर स्थावर झाली, तसा तो परत त्याच्या शूटिंगवर रवाना झाला होता. कोरोना काळात त्याने ‘संगीन’ आणि ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटांची शूटिंग केली आहे.

नवाजुद्दीन त्याच्या घरी आला आहे, तेव्हा त्याचे म्हणणे आहे की, तो परत मुंबईला केव्हा जाईल याबाबत खात्री नाही. ई टाईम्स सोबत बोलताना त्याने सांगितले होते की, “दररोज मी देवाकडे प्रार्थना करतो की, ही परिस्थिती लवकरात लवकर ठीक होऊ देत. देशाला या संकटातून वाचव. पुन्हा सगळ्या गोष्टी आधी सारख्या नॉर्मल होऊ देत, आणि सर्वांना परत काम करु देत.”

नवाजुद्दीनला जेव्हा मुंबईला परत जाण्याविषयी विचारले तेव्हा त्याने सांगितले की, “आता परिस्थिती खूपच खराब आहे. त्यामुळे मला ठाऊक नाही की, मी परत मुंबईला कधी जाईल.”

संगीन चित्रपटाच्या शूटिंगबद्दल विचारल्यावर त्याने सांगितले की, “मी जानेवारीमध्ये संगीनची शूटिंग केली आहे. आम्ही लंडनमध्ये शूटिंग केली आहे. परंतु जेव्हा कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला, तेव्हा संपूर्ण लंडनमध्ये लॉकडाऊन झाले. ती परिस्थिती खूप भयावह होती, तरीही आम्ही संपूर्ण काळजी घेऊन चित्रपटाची शूटिंग केली.”

काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी आलियाने सांगितले होते की, नवाजुद्दीन त्याच्या तब्बेतीची खूप काळजी घेतो. त्यामुळे ती निर्धास्त असते. त्याने त्याच्या कामातून वेळ काढून त्याच्या कुटुंबाला वेळ दिला आहे त्यामुळे ती खूप खुश आहे.

वेकेशनवर जाणाऱ्या कलाकारांवर भडकला होता नवाजुद्दीन
काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनने वेकेशनवर जाणाऱ्या कलाकारांवर चांगलाच भडकला होता. त्याने कोरोना काळात फिरणाऱ्या आणि वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या सर्व कलाकारांना निर्लज्ज म्हटले होते.

तो म्हणाला होता, ‘ते लोक काय बोलणार? अभिनयाबाबत? यांनी तर मालदीवला तमाशा बनवले आहे. मला नाही माहिती की, त्यांचे पर्यटन इंडस्ट्रीशी काय जुगाड आहे. परंतु माणुसकीच्या नात्याने कृपया आपल्या वेकेशनचे फोटो आपल्याकडेच ठेवा. इथे सर्वजण वाईट काळाचा सामना करत आहेत. कोव्हिडच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. जे लोक कठीण काळाचा सामना करत आहेत, त्यांना हे फोटो दाखवून त्यांचे हृदय तोडू नका.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्याचा मराठमोळा सिद्धू लहानपणापासून होता दिवाना; त्याच व्यक्तीबरोबर मिळाली काम करण्याची संधी

-‘ओम शांती ओम’ या पहिल्या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणने दिले नव्हते ऑडिशन, मुलाखतीत केला खुलासा

-जेव्हा सेटवर दयाबेनला ‘ए पागल औरत’ बोलणे जेठालालला पडले होते भलतेच महाग!


Leave A Reply

Your email address will not be published.