×

टीव्ही पाहण्यासाठी मुलीने नाकारलं नवाझुद्दीन सिद्दीकीला, अभिनेत्याने स्वत: सांगितले पुढे काय झाले…

नवाजुद्दीन सिद्दीकीने अलीकडेच खुलासा केला की, त्याच्या गावातील एका मुलीने त्याला टीव्हीसाठी कसे नाकारले. नवाजुद्दीनने सांगितले की, काही वर्षांपूर्वी जेव्हा तो त्याच्या गावात राहत होता, तेव्हा एका मुलीने त्याला टीव्ही पाहणे आवडते म्हणून नाकारले होते. त्या बदल्यात त्या काळातील नवाजुद्दीन या तरुणाने तिला वचन दिले की, एक दिवस तोही टीव्हीवर येईल.

एका मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला आणि सांगितले की, “खरं तर, जेव्हा आमच्या गावात टीव्ही असायचा तेव्हा ती कृषी दर्शना पाहायला जायची. कधी कधी ती वाटेत आली की, मी तिला माझ्याशी बोलायला सांगायचो. पण तिला कृषी दर्शना पाहायला जायचे असल्याने ती माझ्याशी बोलत नसायची. म्हणून मी तिला म्हणालो, एक दिवस मीही टीव्हीवर येईल.” इतकेच नाही तर नवाजुद्दीनने सांगितले की, जेव्हा त्याने त्याच्या पहिल्या टीव्ही मालिकेत काम केले, तेव्हा त्याने एका मित्राला फोन केला आणि मुलीला सांगायला लावले की तो टीव्हीवर आला आहे. (nawazuddin siddiqui was turned down for watching tv after that he become actor)

तो म्हणाला, “जेव्हा मी एक सीरियल केली, तेव्हा मला आठवलं की मी एका मुलीला वचन दिले होते. म्हणून मी माझ्या मित्राला गावी कॉल करून त्या मुलीशी बोलण्यास सांगितले. माझा मित्र म्हणाला, “भाऊ, तिचे लग्न झाले आहे आणि तिला ५-६ मुलं आहेत. आणि ज्याच्याशी तिचे लग्न झाले आहे, तो तिला घराबाहेरही पडू देत नाही.”

नवाजुद्दीन लवकरच टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिरोपंती २’मध्ये पडद्यावर दिसणार आहे. अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या टायगरच्या डेब्यू फिल्म हिरोपंतीचा सिक्वेल आहे. या चित्रपटात नवाजने लैला नावाच्या खूनखर गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. २९ एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Latest Post