दक्षिण भारतातील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी चेन्नईच्या पॉश पोस गार्डन परिसरात एक आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. वृत्तानुसार, हे अपार्टमेंट चेन्नईच्या टेयनामपेट भागात “लगेसी” नावाच्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये आहे . हे डुप्लेक्स इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आहे.
या मालमत्तेची किंमत सुमारे ३१.५ कोटी असल्याच सांगितल जातय. कराराच्या कागदपत्रांनुसार, डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये १४,३६९ चौरस फूट सुपर बिल्ट-अप क्षेत्र आहे, ज्यामध्ये ५,३०८ चौरस फूट बाग क्षेत्र समाविष्ट आहे. एकूण कराराच्या किमतीवर आधारित, प्रति चौरस फूट किंमत अंदाजे २१,९४६ होते. या मालमत्तेचा करार १५ डिसेंबर २०२५ रोजी नोंदणीकृत झाल्याचे वृत्त आहे.
ही मालमत्ता नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या संयुक्त मालकीची आहे. नयनतारा यांचा ९० टक्के वाटा आहे, तर विघ्नेश शिवन यांचा १० टक्के वाटा आहे. कागदपत्रांमध्ये विघ्नेशचे अधिकृत नाव विघ्नेश्वर शिवकोलुंडू असे नोंदवले आहे. या आलिशान निवासस्थानात इमारतीच्या स्टिल्ट क्षेत्रात आठ कव्हर्ड पार्किंग स्पेस देखील आहे.
हैदराबाद, चेन्नई आणि केरळमध्ये तिच्याकडे असंख्य मालमत्ता आहेत. हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये तिच्याकडे दोन घरे आहेत. GQ नुसार, प्रत्येक घराची किंमत ₹१५ कोटी आहे. अहवालानुसार नयनताराने रिअल इस्टेटमध्ये सुमारे ₹१०० कोटींची गुंतवणूक केली आहे.
कामाच्या बाबतीत, नयनतार लवकरच “टॉक्सिक” चित्रपटात दिसणार आहे. सुरुवातीला “धुरंधर २” सोबत १९ मार्च रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता ४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात यश, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्याही भूमिका आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; ३५ कोटींना २.६७ एकर जमीन केली खरेदी


