Saturday, April 20, 2024

दुःखद! राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारे दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते नेदुमुदी वेणु यांचे निधन

तमिळ आणि मल्याळम चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नेदुमुदी वेणू यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सोमवारी (११ ऑक्टोबर) तिरुअनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ काळापासून यकृताच्या समस्येने ग्रस्त होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूपच खराब होती, त्यामुळे त्यांना तिरुअनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करणारे नेदुमुडी वेणू आयुष्याशी लढताना हरले. त्यांच्या निधनाने दक्षिण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

नेदुमुडी वेणू यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे एक उत्तम नाट्य कलाकार बनले. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सहा राज्य चित्रपट पुरस्कार विजेते, वेणू आपल्या मोहक आणि आनंदी स्वभावासाठी ओळखले जात होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी टी. आर. सुशीला आणि दोन मुले उन्नी आणि कन्नन आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांना हादरवून सोडले असून, चाहत्यांसह सोशल मीडियावर फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनीही त्यांच्या निधनावर दुःखावर शोक व्यक्त केला.

खुशबू सुंदरने लिहिले की, “एक महान अभिनेता नेदुमुडी वेणू सर यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. ते केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते, तर एक अद्भुत व्यक्ती देखील होते. माझ्या पतीला त्यांच्या एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा सन्मान मिळाला. ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

पृथ्वीराज सुकुमारन यांनी ट्वीटरवर दुःख व्यक्त करताना लिहिले की, “अलविदा वेणू अंकल! तुमचे काम आणि तुमचे कौशल्य येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच संशोधन सामग्री असेल!”

श्रीदेवी श्रीधर यांनी ट्वीट केले की, “अनुभवी नेदुमुडी वेणू यांचे आज दुपारी दीडच्या सुमारास तिरुअनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.”

सुरेश मॅथ्यू यांनी ट्वीट करत लिहिले की, “नेदुमुडी वेणू यांचे निधन झाले. तुमच्या आनंददायी कामगिरीबद्दल धन्यवाद, कितीही लहान किंवा मोठी भूमिका असो किंवा कोणतीही शैली असो, या व्यक्तीने नेहमीच प्रभाव पाडला आहे.”

सिद्धार्थ श्रीनिवास यांनी ट्वीट करत लिहीले की, “आरआयपी नेदुमुडी वेणू, एक माणूस ज्याने नेहमीच आपल्या परिपक्व आणि अद्वितीय भूमिकांनी प्रेक्षकांकडून कौतुक करून घेतले. भारतीय सिनेमा प्रतिभा आणि अभिनय कौशल्याच्या ह्या समुद्राला नक्कीच आठवेल.”

वंशी काकांनी शोक व्यक्त केला आहे, “महान अभिनेते नेदुमुडी वेणू यांचे आज निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

नेदुमुडी वेणू यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. नेदुमुडी वेणू यांनी आपल्या कारकिर्दीत प्रेक्षकांना एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ज्यात अभिनेता विक्रम स्टारर अपरिचितचाही समावेश आहे. नेदुमुडी वेणू यांनी नाट्य कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९७८ साली दिग्दर्शक जी. अरविंदमच्या ‘थंबू’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मल्याळम आणि तमिळ सिनेमांमध्ये सुमारे ५०० चित्रपटांमध्ये काम केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा