Saturday, June 15, 2024

प्रफुल्लित करणाऱ्या पिवळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये खुलले नेहा पेंडसेचे सौंदर्य

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसेची ओळख आहे. नेहाने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम केले आहे, किंबहुना ती अजूनही करते. ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतून नेहाने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. मालिकांमध्ये यश मिळवत असतानाच नेहाने मराठी चित्रपटांमध्ये देखील पदार्पण केले. त्यानंतर ती नटसम्राट, शर्यत, दुसरी गोष्ट, बाळकडू या चित्रपटांमध्ये झळकली. नेहाने बिग बॉसच्या १२ व्या पर्वात देखील प्रवेश केला होता. नेहा तिच्या कामात कितीही व्यस्त असली तरी ती सोशल मीडियावर पोस्ट करायला विसरत नाही. नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बोल्ड आणि ब्युटीफुल असणाऱ्या नेहाने नुकतेच तिचे पारंपरिक लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा खूपच सुंदर ड्रेस घातला असून, त्यावर कुंदन आणि मोत्याचा रेखीव नेकलेस आणि कुंदनचे मोठे कानातले घातले आहे. बोटात अंगठी, हातात घड्याळ घातले आहे. तिचा ह्या संपूर्ण लुकला तिने लावलेली काळी छोटी टिकली अधिक खुलवत आहे. नेहाच्या या फोटोंवर तिचे फॅन्स आणि कलाकार कमेंट्स करत तिचे आणि तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे. नेहाच्या या फोटोंना २७ हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक्स केले असून, भरभरून कमेंट्स देखील येत आहेत. हे फोटो शेअर करताना नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले, “उदय आणि प्रकाश, नवीन शक्यतांसह नवीन आठवडा.”

नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही महिन्यांपूर्वी शेअर केलेल्या पोल डान्समुळे ती चर्चेत आली होती. नेहा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोजमुळे चर्चेत असते. याशिवाय नेहा बऱ्याचदा ट्रॉलर्सच्या निशाण्यावर देखील असते. तिला अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, वजनामुळे ट्रोल केले गेले आहे. मात्र नेहाने सर्वांना सडेतोड उत्तर देत शांत केले. नेहाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास काही महिन्यांपूर्वी तिचा ‘जून’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सध्या ती ‘भाभीजी घर पे हैं’ नावाच्या मालिकेत दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा