Monday, April 20, 2026
Home कॅलेंडर बॉलिवूडवरील एनसीबीचं धाडसत्र सुरूच! आता ‘ही’ सुपरस्टार जोडी अडकली जाळ्यात…

बॉलिवूडवरील एनसीबीचं धाडसत्र सुरूच! आता ‘ही’ सुपरस्टार जोडी अडकली जाळ्यात…

सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनानंतर नार्कोटिक्स कंट्रोल विभागाने मुंबईत सलग धाडसत्र सुरू केलं. या धाडींमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांची नावे गोवली गेली आणि अनेकांच्या एनसीबी कडून चौकशा देखील झाल्या. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया यांना एनसीपी कडून अटक करण्यात आली होती त्यानंतर कालांतराने दोघेही जामिनावर बाहेर सुटले आहेत. अजूनही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हे धाडसत्र सुरू असून यात आता आणखीन दोन सेलिब्रिटी नावे समोर आली आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला या दोघांनाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सतत चौकशीला बोलावले जात आहे. आता ही गॅब्रिएला नेमकी कोण हे आपण पाहणार आहोत.

गॅब्रिएला डेमेट्रियड्स हीचा जन्म ७ एप्रिल १९८७ रोजी दक्षिण आफ्रिकेच्या पोर्ट एलिझाबेथ येथे झाला. ती सध्या ३३ वर्षांची आहे. तिची आई देखील एक कलाकार होती आणि आजी फॅब्रिक स्टोअर चालवत असे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गॅब्रिएलाने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. याचदरम्यान ती मॉडेलिंग आकर्षित होऊ लागली आणि तिने वयाच्या १६ व्या वर्षापासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली.

गॅब्रिएला मॉडेलिंगच्या असाइनमेंटच्या शोधात भारतात आली आणि इथल्या अनेक कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये तिनं काम केले. २००९ मध्ये गॅब्रिएला जेव्हा इंडियन प्रीमियर लीग मध्ये झळकली तेव्हा ती प्रकाशझोतात आली. २०१२ मध्ये तिने एफएचएम मासिकाचं कव्हर पेज गाठलं. याशिवाय रेड वाईन या मल्याळम चित्रपटाच्या प्रोमोच्या गाण्यात गॅब्रिएला दिसली होती. प्रसिद्ध गायक आदित्य नारायणच्या तू ही प्यार है या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्येदेखील ती झळकली होती. गॅब्रिएलाने बॉलिवूड फिल्म ‘सोनाली केबल’ आणि तेलगू-तमिळ फिल्म ‘ओपीरी’ मध्ये देखील अभिनेत्री म्हणून काम केलं आहे.

गॅब्रिएला तिचं स्वतःचं कपड्याचं लेबल ‘Deme’ चालवते. याशिवाय VRTT Vintage नावाच्या प्लेटफॉर्मची ती सह-मालकीण देखील आहे, जे वापरलेल्या लक्झरी वस्तू खरेदी करतं आणि पुन्हा नव्याने विकतं.
२३ एप्रिल २०१९ ला बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने सोशल मिडीयावर गॅब्रिएलाशी त्याच्या असलेल्या संबंधांबद्दल खुलासा केला होता. इतकंच नाही तर ती आपल्या मुलाची आई होणार असल्याचं देखील त्याने सांगितलं होतं. गॅब्रिएला आणि अर्जुन हे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. यावर्षी जुलै महिन्यात या दोघांना पुत्ररत्नाचा लाभ झाला असून या दोघांनीही त्याचं नाव एरीक असं ठेवलं आहे. यापूर्वी अर्जुनचं एक लग्न झालं होतं आणि तेव्हा त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देखील दिला होता.

नार्कोटिक्स ने अर्जुनच्या घरी धाड टाकल्यानंतर काही प्रतिबंधित औषधं सापडली होती. त्यासाठी या दोघांनाही बऱ्याचदा एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवलं जात आहे. माध्यमांनुसार याच गोष्टींमुळे सध्या या दोघांमध्येही तणावाचं वातावरण तयार झालं आहे. आता या प्रकरणात एनसीबी कडून आणखीन किती तपास होणार? अर्जुन आणि गॅब्रिएला यांना अटक होणार की या दुष्टचक्रातून त्यांची निर्दोष मुक्तता होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

हे देखील वाचा