नुसरत भरुचा दाखवणार ‘भीतीचा नवीन चेहरा’, आगामी हॉरर सिनेमाचा फर्स्ट लूक केला जाहीर


आपण जर पहिले तर मागील काही काळापासून बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपटांचा खूपच मोठा ट्रेंड आला आहे. अनेक हॉरर कॉमेडी, हॉरर रोमँटिक सिनेमे प्रेक्षकांना खूप आवडत आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या या प्रकाराची सर्वच सिनेमे सुपरहिट झाले. येणाऱ्या काळातही बरेच हॉरर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या हॉरर सिनेमांमध्ये अनेक सिनेमे हे विविध भाषांमधील चित्रपटांचे रिमेक देखील आहेत. काही वर्षांपूर्वी मराठीमध्ये ‘लपाछपी’ नावाचा एक हॉरर सिनेमा आला होता. पूजा सावंतच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला. आता याच सिनेमाचा हिंदी रिमेक येत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

अभिनेत्री नुशरत भरुचाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या सिनेमाचा पहिला लूक पोस्ट केला आहे. ‘छोरी’ असे या हिंदी रिमेकचे नाव आहे. हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित केला जाणार आहे. नुसरतने शेअर केलेला हा फर्स्ट लूक काही सेकंदाचा व्हिडिओ आहे. अतिशय भीतीदायक आणि अंगावर शहारा आणणारा हा लूक खूपच गाजत आहे.

या व्हिडिओमध्ये एक महिला लाल रंगाच्या लेहंगामध्ये दिसत आहे. ती महिला गरोदर असून भूत असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या काळोखात, चमकणाऱ्या वीजा आणि गच्चीवर बसलेली भूत या प्रोमोत पाहायला मिळत आहे. पण या प्रोमोमध्ये त्या महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. प्रोमोच्या शेवटी चित्रपटाचे ‘छोरी’ असे नाव दिसते. हा प्रोमो व्हिडिओ पाहिल्यावर काही सेकंदासाठी भीती वाटल्यापासून राहत नाही.

या चित्रपटाच्या माध्यमातून नुशरत पहिल्यांदाच हॉरर चित्रपटात काम करताना सर्वांना दिसणार आहे. नुशरतने हा प्रोमो शेअर करताना लिहिले, “भीतीचा एक नवीन चेहरा आपल्याला त्रास द्यायला येत आहे, छोरी ऑन प्राईम,” हा सिनेमा नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित जरी होणार असला तरी अजून तारीख समोर आली नाहीये. नुसरतसोबतच या चित्रपटात मीता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल हे कलाकारही महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

-अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.