नुसरत जहाँला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; अभिनेत्रीच्या मुलाला कुशीत घेताना दिसला कथित बॉयफ्रेंड यश दासगुप्ता

तृणमूल काँग्रेस खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँने अलीकडेच कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. आता सोमवारी (३० ऑगस्ट) नुसरतला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ती तिच्या घरी पोहोचली आहे. सोशल मीडियावर नुसरतचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात ती हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती तिच्या कथित प्रियकर यश दासगुप्तासोबत दिसत आहे. त्याने नुसरतच्या मुलाला त्याच्या कुशीत घेतले आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नुसरत सर्वप्रथम रुग्णालयातून बाहेर पडते आणि कारमध्ये बसते. त्या दरम्यान ती फोटोग्राफर्सला नमस्ते म्हणते. त्यानंतर यश दासगुप्ता मुलाला मांडीवर घेऊन गाडीत बसतो. नुसरतच्या या व्हिडिओनंतर यश आणि नुसरतच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

निखिल जैनपासून विभक्त झाल्यानंतर नुसरत आणि यश दासगुप्ता रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सतत समोर येत आहे. तरीही या दोघांनी अद्याप या माहितीला दुजोरा दिलेला नाही. प्रसूतीच्या वेळी यश देखील नुसरतसोबत रुग्णालयात उपस्थित होता. नुसरत यश दासगुप्तासोबत हॉस्पिटलमध्ये गेली. मुलाच्या जन्मानंतर माध्यमांनी यशचे नाव घेत सांगितले की, आई आणि मूल दोघेही निरोगी आहेत. नुसरतने तिच्या मुलाचे नाव ‘ईशान’ ठेवले आहे.

नुसरत गर्भवती असल्याचे वृत्त देखील बऱ्याच दिवसांपासून येत होते, पण तिने अधिकृतपणे याची पुष्टी केली नव्हती. यादरम्यान ती सोशल मीडियावर सतत सक्रिय होती. परंतु तिने बराच काळ बेबी बंपसह तिचा फोटो देखील शेअर केला नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिचा बेबी बंपसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नुसरतच्या गर्भधारणेच्या माहितीची खात्री झाल्याचे मानले जात होते.

नुसरतने तुर्कीच्या विवाह नियमांनुसार साल २०१९ मध्ये व्यावसायिक निखिल जैनशी लग्न केले होते. त्यामुळे या लग्नाला भारतात कायदेशीर रेकॉर्ड मिळणार नाही. निखिल जैनने यावर्षी ८ मार्च रोजी नुसरतच्या विरोधात त्यांचा विवाह रद्द केल्याबद्दल दिवाणी दावा दाखल केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

Latest Post