मनोरंजन विश्वातून एक दु:खत बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील श्रॉफ यांचे 15 सप्टेंबर 2023 रोजी निधन झाले. ते नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘ओएमजी 2‘ या चित्रपटात झळकले होते. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. श्रॉफ यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्रॉफ यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सुनील (Sunil Shroff Death) यांनी अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. अभिनेता 17 ऑगस्ट 2022 रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ते ईद साजरी करताना दिसले. ईद मुबारक या गाण्यावर ते भन्नाट डान्स करताना दिसले. सुनील श्रॉफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
‘ओएमजी 2′ व्यतिरिक्त, ते ‘शिद्दत’ आणि ‘प्यार का पंचनामा 2’ या चित्रपटांसाठीही ओळखले जात होते. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता सुनील श्रॉफच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ते अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांचा भाग बनला. अनेक दशकांपासून इंडस्ट्रीचा एक भाग असलेल्या सुनील यांनी अभय, ज्युली, द फायनल कॉल, दीवाना, अंधा युग यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते, परंतु त्यांचा शेवटचा चित्रपट ‘ओएमजी 2‘ होता.
अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर ‘ओएमजी 2’मध्ये ते दिसले होते. एवढेच नाही तर त्यांनी चित्रपटाच्या सक्सेस पार्टीलाही हजेरी लावली आणि पंकज त्रिपाठीसोबतचा सेल्फी शेअर करून त्याची आठवण करून दिली. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ते जगाचा निरोप घेणार हे कोणास ठाऊक होते. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी भरपूर काम केले. (OMG 2 fame actor Sunil Shroff passed away)
अधिक वाचा-
–अंकिता लोखंडेचा डान्स व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणले, ‘तुला लाज…’
–23 वर्षांनी येणार ‘धडकन 2’! अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी पुन्हा मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स?