प्रविण तरडेंचे (Pravin Tarde) चित्रपट म्हणजे भव्यदिव्यता असणार यात काही शंकाच नाही. सध्या प्रविण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचीही अशीच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सध्या हा चित्रपट सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पासूनच या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. पण आता या चर्चित चित्रपटाबद्दल नवीन माहिती समोर आली असून चित्रपटातील कोणत्या कलाकाराने नव्हेतर या व्यक्तीवरच सगळ्यात जास्त खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. कोण आहे ती व्यक्ती चला जाणून घेऊ.
प्रविण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबिरराव’ चित्रपट सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले प्रविण तरडे, सोबतीला असलेली लोकप्रिय स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट सध्या चांगलाच यशस्वी होत आहे. या चित्रपटाची भव्यदिव्य मांडणी, दिग्गज कलाकारांची मांंदियाळी त्यामुळे या चित्रपटासाठी नक्की किती खर्च झाला असाच प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. त्याचबरोबर चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती असेल असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबद्दलचीच एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
सरसेनापती चित्रपटासाठी कोणत्या कलाकाराने नव्हेतर प्रविण तरडेंनी वापरलेल्या घोडीने सर्वात जास्त मानधन घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रविण तरडेंचे घोडेस्वारीचे सीन शूट झालेली ही घोडीच चित्रपटातील सर्वात मोठी सेलिब्रेटी ठरली आहे. कारण या घोडीचा सांभाळ आणि प्रवासासाठीचा खर्चचं मोठा आहे. शुटिंगच्या ठिकाणी या घोडीला एसी ट्रकमधून मुंबईवरुन आणण्यात यायचे. त्याचबरोबर तिचा आहार ठरलेला आणि महागडा होता. तर तिला राहायलाही एसीची सोय करण्यात आली होती. त्यामुळे या घोडीवरच सर्वात जास्त खर्च झाल्याचे प्रविण तरडेंनी सांगितले आहे.
या घोडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला सेटवरील अनेक शब्दांची माहिती झाली आहे. ज्यामुळे ती एक्शन म्हटल की पळते आणि कट म्हटल की थांबते. याआधी ऐतिहासिक तानाजी चित्रपटातही अजय देवगणने या घोडीचा वापर करण्यात आला होता. यामुळेच या घोडीसाठीचा खर्च मोठा आहे. त्यामुळेच चित्रपटात कलाकाराने नव्हेतर या घोडीने सर्वात जास्त मानधन घेतल्याचे बोलले जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा