Friday, March 29, 2024

सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सोनू सूदने सोशल मीडियावर शेअर केली अतिशय हृदयद्रावक पोस्ट, म्हणाला…

या जगातील सर्वात मोठे दुःख म्हणजे एका आईसमोर तिच्या मुलाचा मृत्यू होणे. कोणासोबत असे घडते तेव्हा आपण त्या आईच्या दुःखाचा अंदाज देखील लावू शकत नाही. पण दुर्दैवाने पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईच्या वाट्याला हे दुःख आले आहे. नुकतीच सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्धू मूसेवालाच्या आईवर जणू आभाळच कोसळले आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर फक्त त्याचे कुटुंबच नाही तर संपूर्ण देशच हळहळला आहे. वयाच्या केवळ २८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाची अशी हत्या होणे हे खरंच खूपच निंदनीय आहे. मनोरंजनविश्वातील कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या हत्येवर निंदा व्यक्त करत आहे.

सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर त्याच्या आईचे दुःख व्यक्त करणारी अतिशय भावनिक पोस्ट अभिनेता सोनू सूदने सोशल मीडियावर केली आहे. सोनू सूदला देखील सिद्धू मूसेवालाच्या अशा अचानक मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. सिद्धू मूसेवालाची आठवण काढत सोनुने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनुने सिद्धू मूसेवालाचा त्याच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धू मूसेवाला त्याच्या आईला काहीतरी दाखवताना दिसत असून, यावरून त्यांच्यात असणारे प्रेम आणि बॉंड स्पष्ट दिसून येत आहे.

अतिशय भावुक अशा या पोस्टसोबत सोनुने लिहिले, “अजून एका आईचा मुलगा निघून गेला.” यासोबतच त्याने तुटलेल्या हृदयाचा ईमोजी आणि #RIPSidhuMoosewala हा हॅशटॅग वापरला आहे. पंजाबी गायक असणाऱ्या सिद्धू मूसेवालाची अज्ञात लोकांनी २८ मे रोजी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ माजली. पंजाबी इंडस्ट्रीमधील अमाप लोकप्रियता असणारा गायक आणि काँग्रेस पक्षाचा नेता असणाऱ्या सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर मनोरंजनविश्वात शोकाची लहर पसरली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सिनेसृष्टी पुन्हा शोक सागरात, भरदिवसा ‘या’ प्रसिद्ध मॉडेलने घेतला गळफास

कल्पनेपलीकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही 

हे देखील वाचा