Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘हिरो नंबर १’ चित्रपटातील रिंकू आठवतोय का? आज आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार

‘हिरो नंबर १’ चित्रपटातील रिंकू आठवतोय का? आज आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार

डेव्हिड धवन यांचा ‘हिरो नंबर १’ हा चित्रपट सुपरहिट झाला ठरला होता. १९९७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या चित्रपटात गोविंदा आणि करिष्मा कपूर मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबतच या चित्रपटात परेश रावल, कादर खान, सतीश शाह, शक्ती कपूर आणि हिमानी शिवपुरी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. जर सगळयांना आठवत असेल तर या चित्रपटात एक लहान मुलगा देखील होता. त्या लहान मुलाचे नाव ओंकार कपूर हे आहे. जो या चित्रपटात रिंकू ही भूमिका निभावली होती. आता हाच रिंकू मोठा झाला आहे आणि तो खूपच हँडसम दिसत आहे.

अनेकांना हे माहित नसेल की, या चित्रपटातील रिंकू म्हणजेच ओंकार कपूर आज बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता बनला आहे. नुकतेच त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, त्याने सोनेरी रंगाची शेरवानी घातली आहे. यामध्ये तो अगदी कूल दिसत आहे. ओंकारचा हा फोटो अभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील आहे. मौनी रॉयच्या लग्नात ओंकारने देखील हजेरी लावली होती. तिच्या लग्नातील ओंकारचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (omkar kapoor look in mouni roy wedding)

ओंकार कपूरने त्याच्या करिअरमध्ये ‘हिरो नंबर १’ सोबतच अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या जुदाई या चित्रपटात देखील बालकलाकार म्हणून काम केले आहे. यासोबतच त्याने झुटा कही का’, प्यार का पंचनामा २’, ‘यू मी और घर’ आणि ‘भूतपूर्व’ या चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच येणाऱ्या काळात तो आपल्याला अनेक चित्रपटातून भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा