हॉलिवूडमधील सर्वात ‘बीझी’ कलाकार काळाच्या पडद्याआड, गाजली होती ‘सुपरमॅन’ सिनेमातील भूमिका


‘डिलिव्हरेन्स’ आणि ‘सुपरमॅन’ सारख्या चांगल्या चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते नेड बेट्टी यांचे निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय मीडियाने पुष्टी केल्याप्रमाणे, त्यांचे कोरोनामुळे निधन झाले नाहीये.

नेड बेट्टी यांनी जवळपास पाच दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या काळात त्यांनी अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना त्यांच्या अभिनयामुळे ऑस्कर पुरस्कारांसाठी देखील नामांकित करण्यात आले होते. नेड बेट्टी यांनी ‘नेटवर्क’ या १९७६ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात काम केले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्यांना अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या भूमिकेसाठी नामांकन देखील मिळाले होते.

नेड यांनी अनेक नाटकं, टीव्ही मालिकांमध्ये देखील दमदार काम केले. त्यांची हियर माई गाण्यातली आयरिश गायक जोसेफ लोके ही भूमिका तुफान गाजली. यासाठी त्यांना १९९२ साली गोल्डन ग्लोबसाठी नामांकन देखील मिळाले होते.

नेड यांच्या निधनानंतर हॉलिवूडमधील सर्वच कलाकरांनी या महान कलाकाराला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांना हॉलिवूडमधील सर्वात व्यस्त कलाकार म्हणून ओळखले जायचे. त्यांचे टोपण नाव “The Busiest Actor In Hollywood” ठेवण्यात आले होते. २०१३ अली ते बॅगेज क्लेम सिनेमात अखेरचे दिसले. नेड बेट्टी यांनी चार लग्न केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारने चित्रपटाची फी कमी केली?? पसरलेल्या या बातम्यांना अभिनेत्याने ‘अशाप्रकारे’ दिले सडेतोड उत्तर

-सुशांतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावुक; म्हणाली, ‘तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही…’

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.