धक्कादायक! सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडवर अनेकदा झाला होता लैंगिक अत्याचार; मुलाखतीत केला मोठा खुलासा

pakistani actress somy ali reveals she was physically abused at the age of five nine and fourteen


सामान्य मुलीपासून ते बॉलिवूड अभिनेत्रींपर्यंत अनेकांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ‘सोमी अली’ होय. तिने एका मुलाखतीत आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल मोठा खुलासा केला आहे.

वयाच्या पाचव्या आणि नवव्या वर्षी लैंगिक अत्याचार झाल्याचा, खळबळजनक खुलासा एका मुलाखतीत सोमी अलीने केला आहे. इतकेच नव्हे तर, 14 वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. सोमी अली एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, आता तिने अभिनय सोडला आहे आणि ती ‘नो मोर टिअर्स’ नावाची स्वत: ची स्वयंसेवी संस्था चालवत आहे.

या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सोमी अली बलात्कार पीडित मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. स्वत: लैंगिक अत्याचाराची शिकार असल्याचे तिने उघड केले आहे. सोमीने एका मुलाखतीत या घटनेबद्दल सांगितले आहे. पीपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीत तिने कशाप्रकारे तिच्यावर अत्याचार करण्यात आले याबाबद्दल सांगितले होते.

याबद्दल बोलताना सोमी म्हणाली होती की, “मी हा खुलासा करण्यासाठी थोडा वेळ घेत आहे. पण मी स्वत: एक स्वयंसेवी संस्था चालवत आहे. तरीही मी स्वत:हून या शोषणाचा खुलासा करू शकत नव्हे.”

पुढे ती म्हणाली, “मी 5 वर्षांची असताना पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले. नोकरांच्या खोलीत माझ्यासोबत तीन घटना घडल्या. माझ्या आई- वडिलांनी यावर कारवाई केली. पण ‘हे कुणाला सांगू नको’ असेही त्यांनी मला सांगितले. मी बर्‍याच वर्षांपासून याबद्दल विचार करत आहे की, मी काही चुकीचे केले होते का? माझे पालक मला असे का म्हणाले?”

यानंतर सोमीने असेही सांगितले की, आई-वडील तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण ती समजू शकली नाही. त्यानंतर वयाच्या 9 आणि 14 व्या वर्षी तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यात आला. सोमी अली म्हणाली होती की, “3 वर्षांपूर्वी मी याबद्दल बोलण्यास सुरुवात केली. मी 14 वर्षांपासून स्वयंसेवी संस्था चालवत आहे आणि मला स्वतःबद्दल बोलणे देखील शक्य होत नव्हते.”

सोमी अलीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईत मॉडेलिंगद्वारे केली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. काही चित्रपटात तिने कामही केले. मात्र, ती सुपरस्टार सलमान खानची गर्लफ्रेंड म्हणून अधिक प्रसिद्ध झाली होती. नंतर 1999 मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर सोमी परत अमेरिकेत अभ्यास करण्यासाठी गेली. मिळालेल्या माहितीनुसार ती अद्याप अविवाहित आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा ३०० कोटींचा चित्रपट देणारा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट!’ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उभारले ‘पानी फाउंडेशन’

-खऱ्या आयुष्यात अविवाहित असलेल्या ‘भाईजान’ने चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीसोबत केलंय सर्वाधिक वेळा लग्न, पाहा फिल्मी वेडिंग लिस्ट

-फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीपासून ते डिंपल गर्ल प्रीती झिंटापर्यत; ‘ही’ आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींची खरी नावे


Leave A Reply

Your email address will not be published.