सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही मागे टाकणारी शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे खूपच सुंदर, लवकरच अडकणार लग्नबंंधनात

Pakistani Cricketer Shahid Afridi Daughter Aqsa Afridi Special Information


चित्रपटसृष्टीत जणू लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक कलाकारांचे लग्न पार पडले आहेत, तर काहींचे लवकरच पार पडणार आहेत. त्यामध्ये श्रद्धा कपूरचा मावस भाऊ प्रियांक शर्मा, मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिज्ञा भावे या कलाकारांचे लग्न झाले आहे. अशातच आता सर्वांचा आवडता विषय म्हणजेच ‘क्रिकेट.’ क्रिकेट जगतातूनही लग्नाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदीच्या मोठ्या मुलीची.

आफ्रिदीची मोठी मुलगी अक्सा आफ्रिदी ही सौंदर्याच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींनाही मागे टाकू शकते. तिच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर एकच जोर धरला आहे. तिचे आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचाच २० वर्षीय डावखुरा गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा लवकरच साखरपुडा करण्यात येणार आहे. याबाबत आफ्रिदीने स्वत: रविवारी (७ मार्च) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितले होते.

अक्साच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, आफ्रिदीला अक्सा, असमारा, अंशा, अज्‍वा आणि अरवा अशा पाच मुली आहेत. त्यातील २० वर्षीय अक्सा सर्वात थोरली आहे. अक्साचा जन्म १५ डिसेंबर २००१ रोजी झाला होता. अक्सा सध्या आपले शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचा विवाह करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे .

अक्सा ही दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे ती आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती प्रसिद्ध क्रिकेटपटू आफ्रिदीची मुलगी असली तरीही तिने प्रसिद्धीच्या आयुष्यापासून स्वतःला खूप दूर ठेवलं आहे. आफ्रिदीने अक्साबरोबर त्याच्या पाचही मुलींना प्रसिद्धीच्या आयुष्यापासून दूर ठेवले आहे. त्याच्या मुली काहीवेळा पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याचे सामने पाहायला येतात.

शाहीन आफ्रिदीच्या कुटुंबीयांनी दिली माहिती
शाहीनचे वडील अयाज खान यांनी आपल्या लेकाच्या लग्नाची माहिती जगजाहीर केली. पाकिस्तानी माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले, ‘आम्ही शाहीनच्या लग्नासाठी शाहिदच्या घरी प्रस्ताव पाठवला होता, जो त्यांनी स्विकार केला आहे. ४१ वर्षीय शाहिदची मोठी मुलगी अक्सा आफ्रिदी हिच्यासोबत शाहीनचा साखरपुडा होणार आहे. मात्र अक्सा सध्या तिचे शिक्षण पूर्ण करत असल्याने येत्या २ वर्षात त्यांचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे.’

शाहीन आफ्रिदीची कामगिरी
पाकिस्तानी संघाचा २० वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तान संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. २०१८ मध्ये पाकिस्तान संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आफ्रिदीने २१ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने २४ गडी बाद केले आहेत. तसेच त्याने खेळलेल्या एकूण २२ वनडे सामन्यात ४५ गडी बाद केले आहेत. यात त्याने २ वेळा ५ पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असाच’ नवरा हवाय गं बाई.!! शिल्पा शेट्टीच्या ४२ वर्षीय भगिनीला करायचंय लग्न, नवऱ्याबाबत आहेत ‘या’ खास अपेक्षा

-‘घोस्ट रायडर’चे ५७ व्या वर्षी चक्क पाचव्यांदा लग्न; पूर्व पत्नींनीही लावली लग्नाला हजेरी

-संस्कृती अडकणार लग्नबंधनात? सोनालीच्या भावासोबतचा फोटो पाहून चाहत्यांच्या कमेंट्स


Leave A Reply

Your email address will not be published.