गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाने प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदच्या घरात सर्वेक्षण केले होते. इतकेच नव्हे, तर त्यांच्याशी संबंधित परिसरातही आयकर विभागाने सर्वेक्षण केले होते. याच संदर्भात आता सीबीडीटीने एक निवेदन जारी केले आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, सोनू सूद आणि त्याच्या साथीदारांच्या जागेच्या सर्वेक्षणादरम्यान २० कोटी रुपयांच्या करचोरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत.
आयकर विभागाने पुरावा असल्याचा केला दावा
आयकर विभागाचे असे मत आहे की, विभागाकडे सोनू सूदच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सोनू सूदने बनावट संस्थांकडून बोगस आणि असुरक्षित कर्जाच्या रूपात बेहिशेबी पैसे जमा केले होते.
I-T Dept conducted a search & seizure op at various premises of a prominent actor in Mumbai & also a Lucknow-based group of industries engaged in infrastructure development. 28 premises in Mumbai, Lucknow, Kanpur, Jaipur, Delhi, Gurugram covered: Central Board of Direct Taxes
— ANI (@ANI) September 18, 2021
सीबीडीटीने असे म्हटले आहे की, आयकर विभागाने मुंबईत अभिनेत्याच्या विविध परिसरात सर्वेक्षण केले होते. याच दरम्यान विविध परिसरांच्या विकासात गुंतलेल्या लखनऊ स्थित औद्योगिक क्लस्टरमध्ये छापे आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. सीबीडीटीनुसार, मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली, गुरुग्रामसह अभिनेत्याच्या एकूण २८ परिसरात छापे टाकण्यात आले होते.
During the course of search at the premises of the actor &his associates, incriminating evidence pertaining to tax evasion found. The main modus operandi followed by the actor had been to route his unaccounted income in form of bogus unsecured loans from many bogus entities: CBDT
— ANI (@ANI) September 18, 2021
सोनू सूद संबंधित असलेल्या संस्थांची चौकशी
माध्यमांतील वृत्तानुसार, हे सर्वेक्षण लखनऊचे मोठे उद्योगपती अनिल सिंग यांच्याशी संबंधित आहे. अलीकडेच अनिल सिंग यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला होता. सोनू सूद आणि अनिल सिंग या व्यवसायात भागीदार असल्याचे सांगितले जात आहे. आयकर विभागाची टीम सोनू सूदशी संबंधित असलेल्या सर्व संस्थांची चौकशी करत आहे.
त्याचबरोबर सोनू सूद हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. मात्र त्याने आयकर विभागाच्या या सर्वेक्षणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. असे असूनही लोक सोशल मीडियावर त्याच्या समर्थनासाठी उभे आहेत.
कोरोना काळात बनला देवदूत
मागील वर्षीपासून संपूर्ण जगात कोरोनाचे सावट पसरले आहे. याचदरम्यान या महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, सोनू सूदने अनेक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवून चांगल्या कामाची सुरुवात केली. त्या काळापासून आजपर्यंत मदतीची प्रक्रिया अखंडपणे चालू आहे. लोक सोशल मीडियावर सोनू सूदकडे मदतीसाठी विचारतात आणि सोनू त्यांना लगेच मदत करतो. मग ते कोव्हिडशी संबंधित असो किंवा इतर कोणत्याही समस्येशी संबंधित असो. एकदा सोनू सूदने हो म्हटल्यावर मदत लोकांपर्यंत पोहोचते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भयानक! मृत्यूवेळी अभिनेत्रीच्या अंगावर पसरले होते किडे; ‘या’ आजारामुळे झाली होती अशी दयनीय हालत
-निसर्गाच्या सानिध्यात योगा करताना दिसली रिया चक्रवर्ती; नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
-महेश बाबूला राग अनावर, ६ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या हृदयद्रावक अत्याचारावर केलं ‘हे’ ट्वीट










