Monday, September 25, 2023

करीना कपूरच्या ‘जाने जान’चे पोस्ट रिलीझ; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत करीनाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. करीनाचे चाहते तिची एख झलक पाहण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. आता करीनाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अभिनेत्री करीनाने मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवत होती, परंतु आता ती लवकरच ‘जाने-जान’ चित्रपटाद्वारे ओटीटीवर पदार्पण करणार आहे. नुकतेच या अभिनेत्रीच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

चित्रपटाचे हे नवीन पोस्टर काही काळापूर्वी नेटफ्लिक्स आणि कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया व इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये मालिकेतील कलाकार करीना कपूर, (Kareena Kapoor)  जयदीप अहलावत आणि विजय वर्मा दिसत आहेत. पोस्टर शेअर करताना त्याचे कॅप्शन लिहिले आहे की, ‘प्रत्येक कथेला 2 बाजू असतात, पण याला 3 आहेत.’ ‘जाने जान’चे रहस्य प्रदर्शित झाल्यावर उलगडणार आहे. याआधी अभिनेत्री करीना आणि जयदीपचा फर्स्ट लुक आणि ट्रेलर रिलीज झाला आहे.

चित्रपटाचे नवे पोस्टर पाहताच चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘या कलाकारांना पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही’. तर दुसऱ्याने ‘मी ते पाहणार आहे’ असे लिहिले आहे. तिसऱ्याने लिहिले, ‘विजय वर्माची जादू पडद्यावर पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही’. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. ‘ जाने जान’ चित्रपटातील करीना कपूरच्या पात्राचे नाव डिसूझा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 विजय वर्मा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आणि जयदीप अहलावत हा शाळेतील शिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्याच्या पात्रांचे कौतुक करत होता. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात जयदीप अहलावत, करीना कपूर आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 21 सप्टेंबर 2023 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. (Post release of Kareena Kapoor Jaane Jaan)

अधिक वाचा-
राणादाच्या मांडीवर बसून पाठक बाईंनी दिल्या पोज, पाहा फोटो
‘जवान’नंतर शाहरुखच्या ‘डंकी’ची मीडियावर क्रेझ, किंग खान करणार 21 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स

हे देखील वाचा