मागील अनेक दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून तिच्या फॅन्सला काहीतरी नवीन होणार असल्याचे सांगत होती. ती रोज एक पोस्ट करत नवीन काहीतरी होणार याबद्दल फॅन्सला आठवण करून देत होती. तिच्या पोस्टमुळे साहजिकच तिचे फॅन्स देखील आतुर झाले होते, की नक्की प्राजक्ताचे सरप्राईज आहे तरी काय? अखेर त्या सरप्राईजवरून पडदा बाजूला झाला आहे.
प्राजक्ताने सोशल मीडियावर संध्याकाळी लाईव्ह येत एक नवीन व्यवसाय सुरु करत असल्याचे जाहीर केले. तिने ‘प्राजक्तराज’ नावाचा एक ज्वेलरी ब्रँड लाँच केला आहे. या ज्वेलरी ब्रँडचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच मुंबईमध्ये संपन्न झाले. याचा एक शानदार सोहळा प्राजक्ताने आयोजित केला होता. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची पत्नी असलेल्या शर्मिला ठाकरे देखील या सोहळ्याला उपस्थित होत्या. अभिनय, नृत्य, कविता, फिटनेस, सूत्रसंचालन आदी सर्वच कलांमध्ये पारंगत असणाऱ्या प्राजक्ताने आता एका नव्या व्यवसायात उडी घेतली आहे.
View this post on Instagram
प्राजक्ताने सुरु केलेल्या तिच्या ‘प्राजक्तराज’मध्ये महाराष्ट्रातील लोप पावत असणारे सर्व दागिने ग्राहकांना मिळणार आहे. महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने ‘प्राजक्तराज’मध्ये उपलब्ध असणार आहे. सर्व जुन्या पारंपरिक लोप पावणाऱ्या दागिन्यांची ती महिलांना नव्याने ओळख करून देणार आहे. प्राजक्ताने तिच्या दागिन्यांमध्ये सरा, बुगडी, शिंदेशाही तोडे, पैलू पाटली, मासोळ्या, बेलपान, बकुळीहार, पुतळीहार, साज, ठुशी, नथ, मोहनमाळ, चंद्रहार यासारखे सर्वच दागिने मिळणार आहेत. प्राजक्ताच्या ज्वेलरी ब्रँडमध्ये मिळणारे दागिने खरे नसून ते ऑथेंटिक असणार आहेत. राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये प्राजक्ताचे कौतुक केले. तिने महाराष्ट्राची लोप पावत जाणाऱ्या संस्कृतीला वाचवण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
सध्या या उदघाटनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शर्मिला ठकरे यांना प्राजक्ता तुळशीचे रोप भेट स्वरूपात देताना दिसते मात्र हे रोप देण्याआधी तिने तिच्या पायातील चप्पला काढल्या आणि मग ते रोप शर्मिला ठाकरे यांना दिले. तिच्या या कृतीचे सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. प्राजक्ताला देखील तिच्या या नवीन व्यवसायासाठी सर्वच स्टेर्तून शुभेच्छा मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद काही थांबेना, आता थेट महिला आयाेगाकडून चित्रा वाघ यांना नाेटीस