मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali) ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत प्राजक्ता माळीचे नाव जोडून ती चर्चेत आलेली आहे. या प्रकरणात प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार देखील केली होती. तिने पत्रकार परिषद घेऊन यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे सुरेश धस यांनी जाहीर माफी मागवी, असे तिने सांगितले होते. या सगळ्या प्रकरणा नंतर तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. आणि त्यानंतर सुरेश धस यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे प्राजक्ताची माफी मागितली आणि यानंतर प्राजक्ताने देखील हा विषय इथेच संपलेला आहे. असे सांगितलेले आहे. या दिवसांमध्ये प्राजक्ता माळी खूपच चर्चेत आलेली आहे. यासोबतच प्राजक्ता माळीची संपत्ती देखील एक चर्चेचा विषय झाला आहे. तर आज आपण प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
मालिका विश्वातून करिअरला सुरुवात करणारे प्राजक्ता माळी ही एक हुरहून्नरी अभिनेत्री आहे. यासोबत ती एक व्यावसायिक देखील आहे. तिचं स्वतःचा एक फार्म हाऊस आहे. त्याचप्रमाणे तिने निर्मिती क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेनंतर खूप यश मिळाले. त्यानंतर तिने महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोने सुरुवात केली. प्राजक्ताचा स्वतःचा एक ज्वेलरी ब्रँड देखील आहे. प्राजक्ताराज या नावाने ती पारंपरिक दागिन्यांचा व्यवसाय करत आहे.
प्राजक्ताने आपल्या मराठी जुन्या दागिन्यांचा ट्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आणलेला आहे. तिने स्वतः दागिने घडवण्याचा विचार केला. केवळ महाराष्ट्रातून नाहीतर इतर अनेक राज्यातून देखील तिच्या दागिने साठी मागणी असते. ती ऑनलाईन पद्धतीने हा बिजनेस करते. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी प्राजक्तांने एक मोठे फार्म हाऊस देखील खरेदी केले आहे. आणि यातून ती बक्कळ कमाई करते.
प्राजक्ताचा हे फार्म हाऊस कर्जत येथे निसर्गाच्या सानिध्यात आहे. यात फार्म हाऊसला तिने प्राजक्त कुंज असे नाव दिलेले आहे. यामध्ये एका वेळी 15 तर 20 माणसे सहज राहू शकतात. हे फार्म हाऊस मध्ये थ4 Bhk व्हीला आहे. कर्जत मधील गौळवाडी या गावात हे फार्म हाऊस आहे. इथे तीन बेडरूम, हॉल, किचन, स्विमिंग पूल आहे. त्याचप्रमाणे निसर्गाने वेढलेले हे फार्म हाऊस सध्या लोकांचे आकर्षण बनत आहे. तुम्हाला जर शनिवार रविवारी या फार्म हाऊसवर जायचे असेल, तर 30 हजार रुपये भाडे मोजावे लागते. तसेच सोमवार ते शुक्रवार दरम्यान एका दिवसाचे भाडं हे 17 ते 20 हजार रुपये एवढे आहे. या सगळ्यातून प्राजक्ता भरपूर पैसे कमावते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘ही छत्रपतींची भूमी आहे..’ सुरेश धस यांच्या जाहीर माफीनाम्यानंतर प्राजक्ता माळीचे वक्तव्य चर्चेत
राउडी राठोडची स्क्रिप्ट झाली पूर्ण; या कलाकारांची लागली सिनेमात वर्णी…