Tuesday, April 16, 2024

धारा धारा…बेभान वारा! प्रार्थनाने शेअर केला ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या टायटल ट्रॅकच्या डान्सचा सरावाचा व्हिडिओ

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी असणाऱ्या झी मराठीचे रुपडे काहीशा प्रमाणात बदलले आहे. या वाहिनीवरील अनेक जुन्या गाजलेल्या मालिका वाहिनीने बंद केल्या आणि त्या जागी नव्या मालिका येऊ घातल्या आहेत. काही मालिका तर सुरु देखील झाल्या असून, काही लवकरच सुरु होणार आहेत. सुरु झालेल्या मालिकांमध्ये प्रार्थना बेहेरे आणि श्रेयश तळपदे यांच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा देखील समावेश आहे.

या मालिकेमधून तब्बल दहा वर्षांनी प्रार्थना टीव्हीवर पुनरागमन करत आहे. तर श्रेयश पूर्वीच्या अल्फा मराठी आणि आताच्या झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका, तर दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे देखील या मालिकेच्या माध्यमातून मराठी टीव्ही विश्वात पुनरागमन करत आहे. (mazi tuzi reshimgath tittal track dance practice video)

भारतीय प्रेक्षकांमध्ये गाण्याची प्रचंड क्रेझ आहे. चित्रपटांच्या गाण्यांसोबतच मालिकांच्या टायटल ट्रॅकची सुद्धा प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ आहे. प्रत्येक मालिका त्याचे हटके आणि आकर्षक टायटल ट्रॅक बनवण्याचा प्रयत्न करतात. झी मराठीवर सुरु झालेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकांचे देखील टायटल ट्रॅक सध्या प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहे. नुकताच प्रार्थनाने त्यांच्या या टायटल ट्रॅकवरील डान्स प्रॅक्टिसचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि श्रेयस त्यांच्या मालिकेच्या गाण्यावरील डान्सचा सराव करताना दिसत असून, त्यांच्यासोबत त्यांच्या नृत्यदिगदर्शक देखील दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना प्रार्थने लिहिले, “तू हात हाती धरावा …. ती वेळ जेव्हा तुम्ही डान्सचा सराव श्रेयस तळपदेसोबत करता. टायटल सॉन्ग “माझी तुझी रेशीमगाठ.“

‘धारा धारा.. बेभान वारा…’ असे या गाण्याचे बोल असून, हे गाणे अतिशय सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. गाणे, गाण्यावरील डान्स, गाण्याचे शब्द, श्रेयस प्रार्थनाचा लूक सर्वानाच खूप आवडता आहे. या मालिकेचे सर्वात मोठे आकर्षण बनली आहे, मालिकेची छोटी स्टार असलेली मायरा. सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त मायराच्याच चर्चा होत असून, मालिका सुरु होण्याआधीच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा