शाहरुख खानचा पुढचा प्रोजेक्ट; राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या आयुष्यावर बनवणार वेबसीरिज?

Prashnat kishore likely meet shahrukh khan in mannat house


बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज मंडळींवर चित्रपट बनल्या आहेत. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक बनल्या आहेत. यातच आणखी एक बायोपिक बनत असल्याची माहिती हाती आली आहे. अशातच राजकीय रणनीतिकार ज्यांनी अनेक राजकीय पक्षांसाठी निवडणूकीत रणनीती बनवून त्यांना जिंकवणारे प्रशांत किशोर यांच्यावर लवकरच एक वेबसीरिज बनू शकते.

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, यासंदर्भात प्रशांत किशोर आज अभिनेता आणि निर्माता कंपनी रेड चिलीजचा मालक शाहरुख खान याची भेट घेणार आहेत. ही भेट आज संध्याकाळी 7 वाजता शाहरुख खानचा बंगला मन्नतवर होणार होती.

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, प्रशांत किशोर यांनी त्यांच्यावर बनणाऱ्या वेब सीरिजसाठी पूर्णपणे होकार दर्शवला नाही. त्यांच्या या भेटीत अनेक औपचारिक गोष्टीवर चर्चा होणार असल्याची बातमी समोर आली आहे. आता सर्वांना या गोष्टीची उत्सुकता आहे की, प्रशांत किशोर त्यांच्या आयुष्यावर बनवल्या जाणाऱ्या वेबसीरिजला होकार दर्शवणार आहेत की नाही.

एबीपी न्यूजने या गोष्टीची खात्री करण्यासाठी शाहरुख खानच्या रेड चिलीजला संपर्क करण्याचा देखील प्रयत्न केला. पण त्यांना त्यांच्याकडून या भेटी संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

प्रशांत किशोर यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे घर ‘सिल्वर ओक’ मध्ये भेट घेतली. अनेक तास चाललेल्या या बैठकीत 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत केंद्रामध्ये सत्ता प्रस्थापित करून भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याची चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘दिलवाले’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘बाजीगर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘रईस’, ‘रावण’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.