Friday, October 17, 2025
Home टेलिव्हिजन जमलं रे जमलं! प्रथमेश लघाटेनं अखेर रिलेशनशिपची दिली कबुली; म्हणाला…

जमलं रे जमलं! प्रथमेश लघाटेनं अखेर रिलेशनशिपची दिली कबुली; म्हणाला…

मराठी सिंगिंग रिऍलिटी टीव्ही शो ‘सारेगमप लिटील चॅम्प‘ फेम प्रसिध्द गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन खूप गाजला होता. आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांच्या आवाजाने संपुर्ण महाराष्ट्रला वेड लावले. आता या पंचरत्नांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.

कार्तिकीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले, तर रोहित राऊतनेही गेल्या वर्षी लग्न केले. आता वेगळीच चर्चा रंगली आहे. या चर्चेचे कारण म्हणजे प्रथमेश लघाटेने नवीन पोस्ट केली आहे. त्याने मुग्धा वैशंपायनसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. या दोघांचेही चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.

प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate)  आणि मुग्धाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्यांची कबुली दिली आहे. या जोडप्याने एक रोमँटिक फोटो शेअर केला आणि त्यांच्या चाहत्यांना सांगितले की ते बर्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.

प्रथमेश लघाटे पोस्ट करताना लिहिले की, “Okayy! So! तुम्ही आमच्याकडून ज्या बातमीची अपेक्षा करत होता..तर Finally!!आमचं ठरलंय! ” तसेच. त्याने #MGotModak #ModakGotMonitor #forever #couplegoals असे हॅशटॅग दिले आहेत. त्याची हि पोस्ट पाहून चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या या पोस्टवर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीने कमेंट करतामा लिहिले की, “वेलकम वहिनी” अनेक सेलिब्रिटींनी त्या दोघांचे अभिनंदन केले आहे. लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनीही या दोघांचे अभिनंदन केले आहे. सुकन्या, कार्तिकी गायकवाड, श्रेया बुगडे, प्रियांका बर्वे यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या. (Prathamesh Laghate finally admitted the relationship)

अधिक वाचा-
पुण्यातून अभिनयाचे धडे गिरवणारे मिथुन चक्रवर्ती आहे तब्बल 292 कोटींच्या संपत्तीचे मालक, भावाच्या मृत्यूनंतर सोडला होता नक्षलवाद
पुण्यातून अभिनयाचे धडे गिरवणारे मिथुन चक्रवर्ती आहे तब्बल 292 कोटींच्या संपत्तीचे मालक, भावाच्या मृत्यूनंतर सोडला होता नक्षलवाद

हे देखील वाचा