Saturday, September 30, 2023

पारदर्शक ड्रेस घालून ‘देसीगर्ल’ प्रियांकाने दिली हॉट पोझ, नजर हटविणेही झालंय कठीण

‘देसीगर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणुन प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्याने आणि कसदार अभिनयाने तिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनयाच्या जोरावरच तिने बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास पुर्ण केला आहे. भलेही सध्या ती हिंदी चित्रपटसृष्टीत दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नियमित आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यावरून ती आपले नवनवीन फोटो ती शेअर करत असते. अलिकडेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

प्रियांका चोप्राने आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामुळे वातावरण चांगलेच गरम झाले आहे. कारण या व्हायरल फोटोंमधील पहिल्याच फोटोत प्रियांकाचा हॉट आणि बोल्ड अंदाज दिसून येत आहे. यामध्ये तिने एक लाल पारदर्शी कपड्याचा ड्रेस बनवून पोझ दिल्या आहेत. तिच्या या बोल्डनेसने चाहत्यांची मात्र झोप उडाली आहे.

यासोबतच तिने काही ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खुपच मनमोहक दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करत “व्हॅनिटी फेअर, फेब्रुवारी २०२२” असा कॅप्शन दिला आहे. या कॅप्शनवरून चाहते हा तिच्या आगामी चित्रपट किंवा सिरीजचा इशारा असल्याचा अंदाज लावत आहेत.

प्रियाकांच्या या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने आणि बोल्ड फोटोंवर चाहते मात्र चांगलेच फिदा झाले आहेत. त्यांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कोणी फायर इमोजी, तर कोणी हार्ट इमोजी शेअर करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
फक्त चाहतेच नव्हेतर बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सेलिब्रेटीसुद्धा या फोटोंवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा