प्रियांका चोप्रानंतर आता आई मधु चोप्राचं इंस्टाग्राम बायो आलं चर्चेत, जावयाबद्दल लिहीली ‘ही’ गोष्ट


प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) आई मधु चोप्रा (Madhu Chopra) यांनी अलीकडेच आपल्या मुलीच्या यशाचे कौतुक केले होते. आता त्यांनी जावई निक जोनास याच्या स्तुतीसाठी एक खास गोष्ट लिहिली आहे. मधू यांनी त्यांच्या इंस्टाग्राम बायोमध्ये स्वतःचे ‘जिनियस सासू’ म्हणून कौतुक केले आहे.

प्रियांका चोप्राच्या आईने जावयाला म्हटले ‘जिनियस’
प्रियांका चोप्राच्या आईने त्यांची मुलगी आणि मुलगा सिद्धार्थ चोप्रा आनंदी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहीले आहे, “मी ४०वर्षांपासून डॉक्टर आहे. दोन आनंदी मुलांची आई आणि एका जिनियसची सासू आहे.”

मधु चोप्राने २०१८मध्ये एका मुलाखतीमध्ये असे म्हटले होते, निक जोनस हा खूप शांत आणि प्रेमळ आहे. तिने तिच्या जावयाचे कौतुक देखील केले होते. तो एक अद्भुत माणूस आहे आणि कुटुंबातील प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करतो. तो खूप नम्र आहे आणि त्याला वाडवडिलांबद्दल आदर आहे. त्या असे देखील म्हणाल्या की, एका आईला आणखी काय हवे आहे? (priyanka chopra mother madhu chopra instagram bio called son in law nick genius)

प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिच्याकडे जिम स्ट्रॉसच्या ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ड्रामा सिरीज ‘सिटाडेल’सह बरेच प्रोजेक्ट आहेत. आलिया भट्ट, कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा लवकरत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरू करणार आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!