Oops!! ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राच्या विचित्र ड्रेसने केली होती सर्वांसमोर पंचायत, कशीबशी वाचवली लाज


‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. इतकेच नव्हे, तर तिने हॉलिवूडमध्येही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रियांका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर प्रियांकाचा एक जुना फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर लोक प्रियांकाला ट्रोलही करत आहेत. प्रियांकाचा हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

प्रियांकाचा फोटो झाला व्हायरल
खरं तर, प्रियांकाचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. ज्यात ती एका पुरस्कार सोहळ्याला येताना दिसत आहे. प्रियांकाने ब्लॅक बॉडीकॉन स्टाईलचा ड्रेस घातला आहे. ज्यात एका बाजूने हाई कट आहेत. तसेच शिमरी नेट बसवले आहेत. प्रियांका या वेशभूषेत खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा लूक पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. या फोटोत तिच्यासोबत घडलेल्या वॉर्डरोबच्या खराबीमुळे प्रियांका उप्स मोमेंटची शिकार झाली. तिने कशीबशी आपली लाज राखली.

प्रियांकाने आत्मविश्वासाने कॅरी केला ड्रेस
प्रियांकाने तिचा बोल्ड ड्रेस मोठ्या आत्मविश्वासाने कॅरी केला. तिने पॅपराजींसमोर स्टायलिश पोझही दिल्या. तिने ही पोज देत असताना उघड असलेला भाग हातांनी लपवण्याचाही प्रयत्न केला, पण असे करताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. प्रियांकासोबत असे घडण्याची ही पहिली वेळ नाही. तिने यापूर्वी अनेक वेळा बोल्ड ड्रेस घातला आहे. तिच्या सुपर बोल्ड आऊटफिटमुळे तिला अनेक वेळा ट्रोल देखील केले गेले आहे. प्रियांका तिच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते.

बिकिनी फोटो केले पोस्ट
अलीकडेच प्रियांका चोप्राने तिचे दोन बिकिनी फोटो पोस्ट केले होते. ज्यात ती पती निक जोनास सोबत मजा करताना दिसत होती. या फोटोमध्ये ती बिकिनी घातली असून सन बाथ घेताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या होत्या.

चित्रपट
‘सिटाडेल’ आणि ‘मॅट्रिक्स ४’ व्यतिरिक्त, प्रियांकाचे इतर अनेक हॉलिवूड चित्रपट येणार आहेत.

याशिवाय ती फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये ती प्रथमच आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफसोबत एकत्र दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत


Leave A Reply

Your email address will not be published.