×

पुष्कर-रितेशच्या स्वॅगची चाहत्यांवर भुरळ, ‘अदृश्य’चा धमाकेदार टीझर ‘कू’वर रिलीझ

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच पुष्कर जोग (Pushkar Jog). अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनात त्याची एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. पण ‘मराठी बिग बॉस’नंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. तो मराठी बिग बॉसमध्ये रनरअप विजेता होता. त्याची लोकप्रियता खूप होती. पुष्कर लवकरच त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत रितेश देशमुखही (Riteish Deshmukh) दिसणार आहे.

दरम्यान सध्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे, ती दोन मराठमोळ्या अभिनेत्यांच्या स्वॅगने सजलेल्या या खास बॉलिवुड चित्रपटाची. अशातच या चित्रपटाचा, अर्थात ‘अदृश्य’चा टीझर ‘कू’वर नुकताच अभिनेता पुष्कर जोगने शेअर केला आहे. जो चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. हा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली एवढं मात्र नक्की!

यावर क्लिक करून पाहा कूवरील चित्रपटाचा टीझर

सिनेमा १३ मे रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी आलेल्या ४५ सेकंदांच्या या टीझरमध्ये सिनेमा किती रोमांचक आणि वेगवान असेल, याचा पुरेपुर अंदाज येतो आहे.

या चित्रपटात पुष्कर जोग, मंजरी फडणीस आणि ऋतुपर्णा सेनगुप्ता ही बंगाली अभिनेत्री दिसणार आहे. तसेच रितेश देशमुख देखील या चित्रपटाचा भाग असणार आहे. आता हे सगळे कलाकार मिळून नक्की काय धमाल करणार आहेत हे पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाचे निर्माते अजय सिंग हे असणार आहेत. तसेच कबीर लाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post