आता लग्न झाल्यानंतरही होऊ शकता मिस युनिवर्स, २०२३ पासून होणार ‘हे’ बदल

जगभरातील सुंदर महिलांना एका व्यासपीठावर आणणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ या स्पर्धेसाठी प्रत्येकाला जायचे आहे. आपल्या सौंदर्याला एक ओळख मिळावी, हे स्वप्न प्रत्येक मुलगी कधी ना कधी पाहते. पण, कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते की, मेहनत करूनही अपयश येते, तर कधी वाढत्या वयामुळे तिला त्यात आपले नाव देता येत नाही. मात्र, आता एक अशी बातमी येत आहे, जी ऐकल्यानंतर ज्या महिलांना हा किताब आपल्या डोक्यावर सजवायचा होता, त्यांचे चेहरे फुलतील. मिस युनिव्हर्स ब्युटी कॉन्टेस्टने नुकताच एक नवा नियम जारी केला आहे, ज्यानुसार आता महिला लग्नानंतरही या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

मिस युनिव्हर्सचा मुकुट डोक्यावर सजलेला पाहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांना आता त्यांच्या वयाचा फारसा विचार करण्याची गरज भासणार नाही. कारण आता ना वाढणारे वय, ना लग्न ना मुले त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखणार आहेत. एका रिपोर्टनुसार, यावर्षी होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत गेल्या 70 वर्षांपासून सुरू असलेला नियम संपुष्टात आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार आता विवाहित महिलांनाही या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. हा नियम २०२३ पासून लागू होणार आहे.

पुढील वर्षापासून लागू होणार्‍या या नियमानुसार आता कोणत्याही महिलेला वयामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न सोडावे लागणार नाही. नुकत्याच लागू झालेल्या नियमापूर्वी केवळ १८ ते २८ वयोगटातील अविवाहित महिलांनाच या स्पर्धेत भाग घेता येत होता. या बदलामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. यामध्ये 2020 मध्ये हे विजेतेपद पटकावणाऱ्या मेक्सिकोच्या आंद्रिया मेजाचा समावेश आहे. या नव्या नियमाचे कौतुक करताना अँड्रिया म्हणाली, ‘वैयक्तिकरित्या मी आनंदी आहे. या पदांवर पूर्वी फक्त पुरुषांचाच अधिकार होता, पण आता बदलाची वेळ आली आहे.

आत्तापर्यंत भारताने तीन वेळा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. भारतासाठी, हा खिताब पहिल्यांदा बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने 1994 मध्ये जिंकला होता. यानंतर 2000 मध्ये लारा दत्ता आणि 2020 मध्ये हरनाज कौर संधूला मिस युनिव्हर्सचा ताज मिळाला.

हेही वाचा –
मिथुन चक्रवर्तीच्या सुनेने कास्टिंग काऊचबद्दल केला खळबळजनक खुलासा; म्हणाली, ‘मला मीटिंगमध्येच…’
सोनम कपूर तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे झाली ट्रोल, म्हणाली- ‘मी आनंद साजरा करण्यासाठी काही केले, तर लोक…’
एका वर्षांत १४ सुपरहिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर केला धमाका, वाचा चिरंजीवीचा चित्रपटप्रवास