Saturday, June 29, 2024

व्हिडिओ: ‘पुष्पा’ची क्रेझ अजूनही कायम, भारतीयांचं सोडाच; थेट कोरियन मुलीनेही धरला ‘श्रीवल्ली’वर ठेका

मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर 2021मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा सिनेमा म्हणजे ‘पुष्पा: द राईज‘ होय. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या सिनेमातील डायलॉग्ज, स्टाईल, गाणी या सर्वांनीच प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच, त्यांनी यावर व्हिडिओसुद्धा बनवले होते. या सिनेमाला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. मात्र, अजूनही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांवर कायम आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका कोरियन मुलीने अल्लू अर्जुनच्या स्टेप्स कॉपी केल्या आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक कोरियन मुलगी ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa: The Rise) या सिनेमातील ‘श्रीवल्ली‘ (Srivalli) गाण्यावर थिरकताना दिसत आहे. यामध्ये ती मुलगी टीव्हीसमोर डान्स करत आहे. आणि मागे अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचे ‘तेरी झलक शर्फी श्रीवल्ली’ हे गाणे वाजत आहे. व्हिडिओत मुलगी अल्लू अर्जुनसारखेच कपडे परिधान करून तयार झाल्याचे दिसत आहे आणि त्याची डान्स स्टाईल कॉपी करत आहे. सोशल मीडियावरही या मुलीचे जोरदार कौतुक केले जात आहे.

कोरियन मुलीचा हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाऊंटवर फार पूर्वी शेअर करण्यात आला आहे. मात्र, आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 33 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “कोरियन भारतीयांप्रती खूपच आकर्षित आहेत आणि त्यामुळे ते भारतावरही तितकेच प्रेम करतात, जितके ते कोरियावर करतात.” काहींनी तर त्या मुलीला चक्क भारतात येण्याची विनंतीही केली आहे.

खरं तर, ‘पुष्पा: द राईज’ हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी जोरदार पसंती दर्शवली होती. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अल्लू अर्जुन यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. या सिनेमाने तब्बल 300 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची शूटिंगही सुरू झाली आहे. तसेच, हा सिनेमा लवकरच चित्रपटगृहात एन्ट्री करेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लंडनमध्ये करीनाला पोलिसांनी केली अटक? वाचा काय आहे ‘त्या’ फोटोंमागील सत्य
संगीतसृष्टीवर शोककळा! मुलीला सासरी पाठवताच दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायकाच्या पत्नीचे निधन

हे देखील वाचा