लोकप्रिय चित्रपट सिरीज रेस लवकरच आपल्या चौथ्या भागासह परत येत आहे. प्रेक्षक आतुरतेने याची वात बघत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे लेखक सिराज अहमद यांनी काही खास गोष्टी या चित्रपटाच्या विषयी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितले की चित्रपटात आधीच्या दोन चित्रपटांच्या स्टोरीज पुढे सुरु ठेवण्यात येतील. या चित्रपटाची शूटिंग सुद्धा पुढील वर्षी २०२५ मध्ये सुरु करण्यात येणार आहे. निर्माते रमेश तौरानी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. आता या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा सुद्धा दिसणार आहे.
या चित्रपट मालिकेतील पहिल्या दोन भागांचे लेखन देखील शिराज अहमद यांनीच केले होते. रेस ४ ची पटकथा देखील पूर्णत्त्वाला येत असून लवकरच लिखाण पूर्ण होईल. या चित्रपटासाठी कलाकारांची निवड देखील करण्यात आली असून आता बातमी आहे कि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता सैफ अली खान पुनरागमन करणार आहे. रेस ३ मध्ये हि भूमिका सलमान खान याने केली होती. तसेच त्या चित्रपटात कथा पूर्णतः वेगळी घेण्यात आली होती. रेस ४ मध्ये मात्र या सगळ्या गोष्टी योग्य ठिकाणी आता परत येणार आहेत. लवकरच इतर कलाकारांची अधिकृत घोषणा निर्माते करतील.
रेस ३ या चित्रपटाला अनेक टीकांना सामोरे जावे लागले होते. त्यावर लेखक शिराज अहमद म्हणाले की त्या चित्रपटात सलमान खानच्या हिरोच्या प्रतिमेला लक्षात घेऊन चित्रपट लिहावा लागला होता. रेस ३ मध्ये आम्ही आधीच्या चित्रपटांच्या हिशोबाने बदल खूप केले होते. ते प्रेक्षकांना रुचले नाहीत त्यामुळे साहजिकच आम्हाला टीकेला सामोरे जावे लागले होते. सलमान खान नकारात्मक भूमिका करणार नव्हता. त्यामुळे आम्हाला हे काही बदल करावे लागले होते.
पहिल्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन अब्बास – मस्तान यांनी केले होते. तर तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन रेमो डीसुझा यांनी केले होते. यापूर्वी अफवाह होत्या कि निखिलं अडवाणी यांना दिग्दर्शन करण्यासाठी निवडले होते मात्र रेस ४ साठी अद्याप दिग्दर्शकाची निवड केलेली नाही. आता पुढे बघायचं की हा चित्रपट कोण दिग्दर्शित करेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
हे आहे देवरा चित्रपटाच्या रिलीजचे वेळापत्रक; रात्री एक वाजेपासून असतील शोज…