राज कुंद्राच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर बहीण रीनाने सोडले मौन; म्हणाली, ‘तिला बहीण समजले होते, पण…

बॉलिवूड जगातून कधी कोणत्या बातम्या समोर येतील याचा काहीच नेम नसतो. सोबतच या सोशल मीडियाने यात भर घातली आहे. सोशल मीडियामुळे देखील खूप वेगवेगळी माहिती समोर येत असते. काही दिवसांपासून सोशल मीडियावर राज कुंद्राच्या पूर्वाश्रमीच्या बायकोचा कविताचा एका जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कविताने शिल्पा शेट्टीवर तिचे घर तोडल्याचा आरोप लावला आहे. नेहमी विविध कारणांनी चर्चेत असणारी शिल्पा आणि राज कुंद्रा यांची जोडी आता एका वेगळ्याच आणि गंभीर कारणामुळे चर्चेत आली आहे.

एका मुलाखतीदरम्यान राज कुंद्राने कविताच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. राजने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “माझ्या बायकोच्या वाढदिवसाच्या काहीच दिवसांनी हा असा व्हिडिओ व्हायरल होणे आणि अशी चुकीची माहिती व्हिडिओमधून समोर येणे खूप चुकीचे आहे. मी या सर्व गोष्टीवर नेहमीच बोलणे टाळले. मागील अनेक वर्ष मी या सर्व प्रकरणावर मुद्दामच काही बोलत नव्हतो. मात्र, आता मला शांत राहता येणारच नाही. मला बोलावेच लागणार आहे.”

राजने कवितावर काही आरोप लावत सांगितले की, “कविता ही माझ्या बहिणीच्या नवऱ्याच्या खूप जवळ जात होती. त्यांच्यासोबत खूप जास्त वेळ ती घालवू लागली, खासकरून मी जेव्हा जेव्हा बिजनेस ट्रिप्सवर जायचो, तेव्हा हे खूप घडायचे. माझ्या कुटुंबातील अनेकांना ही कुनकुन लागली होती सोबतच आमच्या ड्रायव्हरला देखील याबद्दल माहिती होती. पण तरीही मी यावर कधीच विश्वास ठेवला नाही. पण पुढे गोष्टी हाताबाहेर जात होत्या. त्यानंतर आम्ही वेगळे झालो. मात्र, आज जेव्हा शिल्पावर घर तोडण्याचे खोटे आरोप लागत असताना मी शांत बसने शक्यच नव्हते. इतकी वर्ष मी शिल्पामुळेच शांत होतो. तिनेच मला याबद्दल बोलायला मनाई केली होती. पण आता तिच्याबद्दल चुकीचे बोलत असल्याने मला बोलणे आवश्यक झाले.”

राजसोबत राजची बहीण असलेल्या रीनाने देखील यावर मत मांडले असून ती म्हणाली की, “मी आणि कविता खूप जवळच्या मैत्रिणी होतो. आमचे एकमेकींवर खूप प्रेम होते. मी कविताला नेहमीच मोठी बहीण समजायचे. मात्र, कविताने माझ्यासोबत खूपच चुकीचे केले. मीही कधीच हा विचार केला नव्हता की, ती माझ्यासोबत असे काही करेल.”

राज कुंद्रा आणि कविताने २००३ साली लग्न केले होते. त्यानंतर २००६ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २००९ मध्ये राज आणि शिल्पाचे लग्न केले. आज राज आणि शिल्पाला विवान आणि समिशा अशी दोन मुलं आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा

Latest Post