जेव्हा राजेश खन्नांच्या सेटवर आलेल्या तरुणींनी त्यांना पाहताच घातला गराडा; कपडे फाडून अशी केली होती त्यांची हालत


प्रेक्षकांमध्ये आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल असलेले प्रेम अनेकदा व्यक्त होताना आपण पाहिले आहे. चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असतात. फॅन्स आणि कलाकार हे दोघे एकमेकांवर विसंबून असतात. फॅन्सच्या मनात कलाकरांबद्दल असलेली क्रेझ काही आजची नाही. ही क्रेझ काल, आज आणि उद्याही सारखीच असणार आहे. फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारांसाठी काहीही करायला तयार असतात. कधी कधी त्यांचे प्रेम दाखवण्याची पद्धतही हटके पाहायला मिळते.

चाहत्यांचे न भूतो न भविष्यती असे प्रेम आजपर्यंत सर्वात जास्त अनुभवायला मिळाले ते अभिनेते म्हणजे राजेश खन्ना. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार हा ताज मिळवणारे अभिनेते म्हणजे राजेश खन्ना अर्थात आपल्या सर्वांचे काका. राजेश खन्ना यांनी जे स्टारडम, फॅन्सचे प्रेम अनुभवले ते आजपर्यंत क्वचितच कोणाच्या वाटेला आले असेल. फॅन्सकडून राजेश खन्ना यांच्या रील आणि रियल या दोन्ही व्यक्तिमत्वांची हुबेहूब कॉपी केली जायची. त्यांची चालायची, नाचायची, खायची, बोलायची आदी सर्व स्टाइल तरुण मंडळी त्यांच्या आयुष्यात कॉपी करायचे. इतकेच नव्हते त्याकाळात जन्मलेल्या मुलांची नावे देखील ‘राजेश’ ठेवली जायची. राजेश खन्ना हे जेवढे तरुणांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय होते तेवढेच किंबहुना जास्तच ते तरुणींमध्ये लोकप्रिय होते.

राजेश खन्ना यांच्या फॅन्स असलेल्या तरुणींबद्दलचे अनेक किस्से आजही इतक्या वर्षांनी ऐकवले जातात. मुली राजेश खन्ना यांना रक्ताने पत्र लिहायच्या, त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीला मुली किस करायच्या. मुलींच्या लिपस्टिकमुळे ती गाडी लाल रंगाची दिसायची. शिवाय अनेक मुलींनी राजेश खन्ना यांच्या फोटोसोबत लग्न केले होते. असे अनेक किस्से राजेश खन्ना यांच्याबद्दल सांगितले जातात. आज आम्ही असाच एक जास्त कोणाला माहित नसलेला किस्सा तुम्हाला सांगणार आहोत.

राजेश खन्ना यांचा हा किस्सा जुनिअर मेहमूद यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. ते म्हणाले होते की, ” एकदा राजेश खन्ना यांच्या एका सिनेमाचे शूटिंग सुरु होते आणि ते शूटिंग पाहायला कॉलेजच्या काही मुली आल्या होत्या. काही वेळानंतर राजेश खन्ना सेटवर आले. ते आलेले पाहून त्या मुली वेड्या झाल्या आणि त्या काकांवर तुटून पडल्या. यादरम्यान झालेल्या ओढाताणीमध्ये काकांचे कपडे फाटले होते. काकांनी असे प्रेम अनेकदा अनुभवले होते, यावेळेस तर तरुणींनी चक्क काकांचे कपडे फाडले होते. हा अनुभव त्यांच्यासाठी देखील नवीनच होता. मात्र तरीही त्यांनी मुलींना सह्या दिल्या होत्या.”

जुनियर महमूद काकांच्या स्टारडमबद्दल पुढे म्हणाले, “मी त्यांच्यासोबत जवळपास १० चित्रपटांमध्ये काम केले मात्र जे स्टारडम राजेश खन्ना यांनी अनुभवले, माझ्या माहितीनुसार ते स्टारडम अजून कोणालाच मिळाले नाहीये. शुक्रवारी त्यांचा सिनेमा प्रदर्शित होणार असेल, तर शाळा कॉलेजमधून मुली त्यादिवशी गायब असायच्या.”

राजेश खन्ना यांनी त्यांच्या काळातल्या सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले होते, मात्र शर्मिला टागोर आणि मुमताज यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली. काही काळाने जेव्हा अमिताभ यांची एन्ट्री चित्रपटांमध्ये झाली तेव्हा राजेश खन्ना यांचं चार्म कमी होत गेला आणि त्यांचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ग्रेसी सिंग; २० वर्षांनंतर अशी दिसतेय आमिर खानची अभिनेत्री

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.