Friday, April 19, 2024

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचे अधिकार ‘या’ कंपनीकडे; आजच होणार टिझर रिलीझ

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तमिळ आणि तेलुगूमध्ये तर त्यांना देवाप्रमाणे पुजले जाते. जेव्हा त्यांचा नवीन चित्रपट येतो, तेव्हा राज्यामध्ये जत्रा असल्यासारखे वातावरण पाहायला मिळते. अशात त्यांचा एक आगामी चित्रपट ‘अन्नाथे’ बाबत अनेक चर्चा चर्चा चालू आहेत. अशातच हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अशी बातमी आली आहे की, चित्रपटाचे अधिकार आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये प्रदर्शित होण्याआधी एशियन सिनेमाजने खरेदी केले आहे.

रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सीवा यांनी केले आहे. हा एक ऍक्शन चित्रपट आहे. या दिवाळीच्या उत्सवात हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे अधिकार लिडिंग डिस्ट्रिब्यूशन कंपनी एशियन सिनेमाजद्वारे खरेदी केले आहेत. यासोबत याचे तमिळ आणि तेलुगू अधिकार देखील खरेदी केले आहेत. नारायणदास नारंग आणि सुरेश बाबूद्वारे हा चित्रपट तेलुगू दर्शकांसमोर आणला जाणार आहे. तेलुगू राज्यात चित्रपटाचे ग्रँड प्रदर्शन होणार आहे. (rajinikant upcoming movie annaatthe teaser out and its tamil and telugu rigts sold)

‘अन्नाथे’ या चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटात रजनीकांतसोबत नयनतारा, मीना, खुशबू, जगपती बाबू आणि प्रकाश राजसोबत बाकी इतर कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला इमानने संगीत दिले आहे. व्हर्टी हे सिनेमॅटोग्राफर आहेत.

यासोबतच रजनीकांत यांनी या चित्रपटाचा टिझर व्हिडिओ देखील शेअर केला जाईल. हा व्हिडिओ सन टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर गुरुवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता प्रदर्शित केला जाईल. या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. यासोबत त्यांनी एक मोशन पोस्टर देखील शेअर केला आहे.

रजनीकांत हे एक प्रतिभावान अभिनेते आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नव्हे, तर अवघ्या देशभर त्यांचे चाहते पसरलेले आहेत. त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद होतो. या वयात देखील ते चित्रपटसृष्टीत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास कमी पडत नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रतिक्षा संपली! ‘भाईजान’ने जाहीर केली ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, टिझर पाहूनच चाहते खुश

-मोठी बातमी! ईडीकडून नोरा अन् जॅकलिनला समन्स; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रींची कसून चौकशी

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

हे देखील वाचा