सुपरस्टार रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश? वेग धरलेल्या बातम्यांवर आता अभिनेत्याने स्वत: लावला पूर्णविराम


मनोरंजन क्षेत्र आणि राजकारण हे दोन क्षेत्र म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण अनेक कलाकार अभिनयासोबतच राजकारणात देखील काम करतात, तर काही नेते राजकारणासोबतच अभिनय देखील करतात. दुसरी शक्यता जरी कमी असली, तरी त्याची सुद्धा अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. अनेक कलाकार त्यांची सेकंड इंनिंग राजकारणात प्रवेश करत सुरु करतात.

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात मनोरंजन विश्वातील सर्वात मोठे सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार, असे जाहीर केले होते. जानेवारी २०२१ मध्ये ते त्यांची पार्टी लॉन्च करणार होते. मात्र काही दिवसातच त्यांना त्यांच्या तब्येतीच्या काही समस्या जाणवू लागल्या आणि त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट झाले. त्यामुळे त्यांनी राजकारणात येण्याचा त्यांचा निर्णय मागे घेतला.

रजनीकांत यांनी त्यांची पार्टी घोषित करताना, तामिळनाडू विधानसभा निवडणूक समोर ठेऊन हा निर्णय घेतला होता. पण त्यांनी त्यांच्या या निर्णयावर पुनर्विचार करणार असल्याचे जाहीर केले. आज रजनीकांत यांनी ते राजकारणात येणार नसल्याचे जाहीर केले आहे.

एका अधिकृत पत्राद्वारे त्यांनी माझा राजकारणात येण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे सांगितले आहे. रजनीकांत यांनी त्यांच्या पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत विचार विनियम करून हा निर्णय घेतला आहे. सोबतच त्यांनी एक पत्र देखील जाहीर केले आहे.

त्यात त्यांनी म्हटले, “मी राजकारणात न येण्याचे ठरवले आहे. कारण कोरोनामुळे निवडणुकांच्या प्रचारात लोकांना भेटणे मला शक्य नाहीये. काही लोकं मी राजकारण प्रवेश करणार नाही म्हटल्यावर, माझी आलोचना करतील. पण आता मी कोणतीही जोखीम घेण्यासाठी तयार नाही. हा निर्णय घेणे माझ्यासाठी खूप अवघड होते. मात्र पूर्ण विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे.”

रजनीकांत यांच्यासोबत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. ‘रजनी मक्कल मंद्रम’ पार्टी जरी आता संपुष्टात आली असली, तरी ही संस्था आता ‘रजनी रसीगर नरपानी मंदराम’ नावाने लोकांच्या कल्याणासाठी काम करेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.