Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड ‘ड्रीम गर्ल 2’चा जलवा बॉक्स ऑफिसवर कायम! रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत ‘Gadar 2’लाही पछाडले

‘ड्रीम गर्ल 2’चा जलवा बॉक्स ऑफिसवर कायम! रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत ‘Gadar 2’लाही पछाडले

सनी देओल याच्या ‘गदर 2‘ सिनेमाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. मात्र, आता आयुष्मान खुराना याच्या ‘ड्रीम गर्ल 2‘ सिनेमानेही सर्वांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. सिनेमाला प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळत आहे. 35 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या कॉमेडी ड्रामा सिनेमाने पाच दिवसांमध्येच 50 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. या सिनेमाने आतापर्यंत 52 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चला तर, सिनेमाच्या पाचव्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहूयात…

अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याच्या ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) सिनेमा 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. या सिनेमाने पाचव्या दिवशी 5.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल 10.69 कोटी रुपयांची कमाई केली होती. यासोबतच हा सिनेमा आयुष्मानच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा ओपनर बनला आहे. सिनेमाने दुसऱ्या दिवशी 14.02 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 16 कोटींची कमाई केली होती. तसेच, चौथ्या दिवशी सिनेमाने 5.42 कोटी रुपये कमावले होते.

‘गदर 2’ला टाकले मागे
‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमाचा जलवा बॉक्स ऑफिसवर कायम आहे. तसेच, हा सिनेमा सातत्याने सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाला टक्कर देत आहे. मंगळवारी (दि. 29 ऑगस्ट) ‘ड्रीम गर्ल 2’ने 5.87 कोटी रुपये कमावले होते, तर ‘गदर 2’ सिनेमाला 5.10 कोटींवर समाधान मानावे लागले. मात्र, मंगळवारी ‘गदर 2’ सिनेमाच्या रिलीजचा 19वा दिवस होता. तसेच, सिनेमाने आतापर्यंत 465.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर धमाल करणारा हा सिनेमा आयुष्मान या सिनेमापुढे गुडघे टेकताना दिसत आहे.

चाहत्यांवर ‘पूजा’च्या अदांची जादू
आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर हा एक कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे. हा सिनेमा 2019मध्ये रिलीज झालेल्या ‘ड्रीम गर्ल’ या सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमात आयुष्मानने ‘पूजा’च्या आवाजाने सर्वांनाच घायाळ केले होते. आता या सिनेमाचा सीक्वलही प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या सिनेमात आयुष्मानव्यतिरिक्त अन्नू कपूर, परेश रावल, अनन्या पांडे, विजय राज, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी आणि असराणी यांचाही समावेश आहे. (actor ayushmann khurrana dream girl 2 day 5th box office collection beat sunny deol gadar 2 read how much crores earned)

हेही वाचा-
ब्रेकिंग! मराठमोळ्या अभिनेत्याचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; चाहता म्हणाला, ‘तुझ्यासारखा संवेदनशील व्यक्ती…’
शाहरुखने ‘Jawan’च्या रिलीजपूर्वी घेतले वैष्णो देवीचे दर्शन, कडक सुरक्षा घेऱ्यात दिसला ‘किंग’ खान

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा