Thursday, April 25, 2024

एकेकाळी ‘रिक्षा चालवणारा’ कसा बनला कॉमेडीचा किंग, वाचा हा खडतर प्रवास

राजू श्रीवास्तव हे कॉमेडीच्या जगातील सर्वात प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि भारतातील सर्वोत्तम विनोदी कलाकारांपैकी एक होते. गजोधर भैय्या पात्र असो किंवा अभिनेत्याची नक्कल करणे असो, राजू श्रीवास्तव सर्वच बाबतीत सर्वोत्कृष्ट होते. अत्यंत गरिबीतून ते वर आले आहेत. आज (दि, 25 डिसेंबर 1963) रोजी त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा गावामध्ये झाला होता. त्यांनी कानपुरसारख्या शहरातून बाहेर पडून संघर्ष करुन एक वेगळीच ओळख निर्माण केली होती.

राजू श्रीवास्तव (Raju Srivastav)  यांचे लहानपणाचे नवा सत्य प्रकाश (Satya Prakash) असे होते मात्र, त्यांना सर्वत्र राजु श्रीवास्त या नावानेच ओळखले जायचे. राजुजींना राजूला शब्दांचे कौशल्य वडिलांकडून मिळाले होते. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव (Rameshchandra Srivastav) कानपूरचे लोकप्रिय कवी होते आणि आपल्या कवितांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे. तर राजू श्रीवास्तव त्यांच्या कविता लक्षात ठेवायचे आणि शाळेतल्या मित्रांना त्या ऐकवायचे. राजूजींना लहानपणापासूनच कॉमेडीची आवड होती आणि जबरदस्त मिमिक्री करण्यातही ते पारंगत होते.

राजू श्रीवास्तव यांचा कॉमेडियन होण्याचा प्रवासही सोपा नव्हता. मुंबईत आल्यावर त्यांना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. मुंबईसारख्या शहरात घरून पाठवलेला पैसा कमी पडायचा. अशा परिस्थितीत खर्च भागवण्यासाठी राजूंनी मुंबईत रिक्षा देखिल चालवला होता. रिक्षामध्ये बसलेल्या एका ग्राहकानेच त्यांना पहिलं काम मिळवून दिलं होतं. राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या कॉमेडीसाठी पहिल्यांदा 50 रुपये मिळाले होते.

राजूजींनी आपल्या करिअरमध्ये खूप धनदौलत आणि संपत्ती कमवली आहे. मात्र, एक वेळ अशीही होती की, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूप हालाकिची होती, त्यांच्याकडे शाळेची फी भरण्यासाठी देखिल पैसे नसायचे. पण राजूजींचे कौशल्य पाहिल्यानंतर शाळेनेही त्यांची फी माफ केली होती. त्याशिवया अभिनेता आपल्या शाळेतील शिक्षकांची मिमिक्री कारयचे. त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांना शाळेतर्फे स्कॉलरशिपही दिली जायची.

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून केली होती. मात्र, त्यांना खरी ओळख ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ ( The Great Indian Laughter Challenge) या कार्यक्रमाधून मिळाली होती. कार्यक्रमामधील त्यांनी आपल्या पंच लाईनने लोकांना खूप हसवले आणि त्यांचं कॉमेडीतील गजोधर भैय्या (Gajodhar Bhaiya) हे प्रसिद्ध पात्र अजरामर झालं. राजू श्रीवास्तव हे कार्यक्रमामधील उपविजेता ठरले होते, पण प्रेक्षकांनी त्यांनी ‘द किंग ऑफ कॉमेडी’ ही पदवी दिली. चाहते आजही त्यांचे व्हिडिओ आवर्जून पाहात असतात.

राजू श्रीवास्त यांनी स्टॅंडप कॉमेडीत प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपाटांमध्ये काम केले होते. राजू अभिनय क्षेत्रामधील अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचे मोठे फॅन होते. राजूजी बिग बॉस 3 चेही स्पर्ध होते, त्येवेळी देखिल त्यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. सगळ्यांना पोटधरुन हसायाल भाग पाडणारे राजू श्रीवास्व यांनी ( दि, 21 सप्टेंबर 2022) रोजी जागला राम राम ठेकला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गळफास घेऊन आत्म’हत्या करणाऱ्या अभिनेत्रीचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल, करत होती ‘हे’ कृत्य
लग्न होऊनही जगापासून का लपवले जय भानुशाली आणि माही वीज यांनी त्यांचे नाते? केला मोठा खुलासा

हे देखील वाचा