Friday, April 19, 2024

बाबो!! राखीचं काही खरं नाही, आता बिग बॉसच्या घरातच पडलीये ‘याच्या’ प्रेमात; म्हणते, ‘त्याच्यासाठी नवऱ्याला पण सोडेन’

बिग बॉसचं सध्या चौदावं पर्व सुरू आहे. या पर्वात आधीच्या पर्वातील काही स्पर्धकांना पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये राहुल महाजन, कश्मीरा शाह, राखी सावंत, विकास गुप्ता यांसारखे स्पर्धकांना घरात एन्ट्री दिली आहे.

मात्र, या सर्वांमध्ये जेव्हापासून राखी सावंत बिग बॉसच्या घरात आलीये, तेव्हापासून तिने या शोला जणू जिवंत केलं आहे. राखीची एन्ट्री झाल्यापासून ती सलमानची आवडती स्पर्धकही झाली आहे.

राखी नेहमीच काहीतरी नवं करत राहते, जे प्रेक्षकांनाही खूप आवडतं. कधीकधी ज्युलीचा आत्मा तिच्यात येतो, कधीकधी ती भावनिक होते. आता ती बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाच्या प्रेमातदेखील पडली आहे.

Rakhi Sawant & Abhinav
Rakhi Sawant & Abhinav

एकीकडे राखीला तिच्या पतीची आठवण येते, तर दुसरीकडे ती एका स्पर्धकाच्या प्रेमातसुद्धा पडली आहे. वास्तविक राखी सावंत रुबीना दिलक हिचा पती अभिनव शुक्ला याच्या प्रेमात आहे. आणि हे स्वतः राखीने बिग बॉसला सांगितलं आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये राखी बिग बॉसला सांगत आहे की, तिला अभिनव आवडू लागला आहे.

शोशी संबंधित प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये बसलेली दिसत आहे. राखी इथे खूप भावनिक झालेली पाहायला मिळतेय. कन्फेशन रूममध्ये बसून राखी बिग बॉसला ओरडून सांगते की, ‘माझा नवरा सर्वांसमोर यावा अशी माझी इच्छा आहे. जेव्हा मी प्रत्येकीचे पती पाहते तेव्हा मला काहीतरी होऊ लागतं. मी रुबिकाच्या नवऱ्याला चोरू का? त्याचं शरीर किती हॉट आहे.’

राखी इथेच थांबत नाही आणि म्हणते, ‘बिग बॉस, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कुणी आवडत असेल तर ते आवडणे चुकीचे आहे का?’ बिग बॉस राखीला ‘नाही, मुळीच नाही’ असं उत्तर देतात. यानंतर राखी म्हणते, ‘ तर मग मी अभिनवला आय लव्ह यु बोलू?’

त्याचबरोबर राखी शोमध्ये तिचा नवरा रितेशशी घटस्फोट घेण्यासही तयार आहे. बिग बॉसशी बोलताना राखी असेही सांगते की आतापर्यंत रुबीना अभिनवसाठी भांडत होती, परंतु आतापासून तीदेखील असंच करेल. यानंतर राखी स्वत:ला अभिनवची प्रेयसी म्हणू लागते.

हे देखील वाचा