Monday, September 25, 2023

रवींद्र महाजनी यांच्या लेकीबद्दल माहिता आहे का? जाणून घ्या कशी आहे गश्मीरची ‘छोटी आई’

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय देखणे आणि लोकप्रिय अभिनेते असलेल्या रवींद्र महाजनी यांचे 15 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाजनी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरतचा निरोप घेतला. रवींद्र महाजनी यांनी मराठीमध्ये 70आणि 80च्या दशकात मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रवींद्र महाजनी हे जेवढे 90च्या काळात प्रसिद्ध होते. तेवढेच ते आजच्या पिढीला देखील खूप आवडायचे. त्याच्या जाण्याने त्यांचे चाहते देखील खूप दुखावले गेले होते.

रवींद्र महाजनी यांच्या पाश्चात पत्नी माधवी, मुलगा गश्मीर (Gashmir Mahajani) आणि मुलगी रश्मी असा परिवार आहे. त्याचा मुलगा देखील सिनेक्षेत्रातील आघाडीचा अभिनेता आहे. गश्मीरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. गश्मीर सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याचे आणि परिवारातील अनेक व्यक्तींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. वडिल गेल्याचे दु:ख गश्मीरने पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यानंतर गश्मीरला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले.

या दरम्यान आता गश्मीरची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी महिला दिनानिमित्त गश्मीरने एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने बहिण, आई आणि पत्नी विषयी लिहिले आहे. त्याने लिहिले की, ” ‘गश्मीर माधवी महाजनी’, ‘गश्मीर रश्मी महाजनी’ आणि ‘गश्मीर गौरी महाजनी’ सर्वांचा उल्लेख केला आहे. त्यात त्याने बहिणीसोबतचाही एक फोटो शेअर केला आहे. इतकचं नाही तर त्याने कागदोपत्री काहीही नाव असलं तरी मनात आणि मनापासून हिच नाव लक्षात राहतील असेही म्हटले.

गश्मीरने पुढे लिहिले की, “माझी बहिण, माझ्यापेक्षा 13वर्षांनी मोठी आहे. पण तरीही ती माझी आई आहे. K.G. पासून ते पाचवी पर्यंत ती रोज माझा डब्बा भरायची, मला शाळेसाठी तयार करायची आणि मला तिच्या कायनेटिक होंडा वरुन शाळेत सोडायची. जन्मापासूनच मी तिचा आवडता स्टार होतो. माझ्या चित्रपट फ्लॅप ठरला तरी माझी एक फॅन निश्चितच माझ्या पाठीशी कायम उभी असायची.” असे त्याने सांगितले.

अधिक वाचा- 
राणादा आणि पाठकबाईंच्या ‘त्या’ कृत्याने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; व्हिडिओ एकदा पाहाच
बोल्डनेसची सीमा पार! निक्की तांबोळीचा ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांनाही फुटला घाम

हे देखील वाचा