Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड वडिलांच्या निधनानंतर तणावामुळे गश्मीर महाजनीचं वाढलं ‘एवढं’ वजन, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

वडिलांच्या निधनानंतर तणावामुळे गश्मीर महाजनीचं वाढलं ‘एवढं’ वजन, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

मागील काही काळापासून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा अभिनेता गश्मीर महाजनी जोरदार चर्चेत आहे. कारण, मागील महिन्यात 11 जुलै रोजी त्याचे वडील आणि दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले होते. पुण्यातील भाड्याच्या घरात ते मृत अवस्थेत आढळले होते. अशात अलीकडेच अभिनेत्याने खुलासा केला की, या तणावामुळे त्याचे वजन खूपच वाढले होते.

तणावामुळे गश्मीर महाजनीचे वाढले 8 किलो वजन
गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा माध्यमांमध्ये जरी कमी दिसत असला, तरी अभिनेता सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत जोडला राहतो. यावेळी अभिनेत्याने खाण्याच्या तणावामुळे मागील एक महिन्यात वाढलेल्या वजनाविषयी काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. गश्मीर सध्या कामापासून दूर होता आणि त्याने स्थिती ठीक करण्यासाठी काही काळ ब्रेक घेतला होता.

त्याने आधी शेअर केले होते की, त्याची आई रुग्णालयात दाखल होती. तसेच, सध्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या तंदुरुस्त आहेत. चाहत्यांनी गश्मीरला विचारले की, तो स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करत आहे? यावर गश्मीरने मागील महिन्यात वजन वाढण्याबाबत अपडेट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिलेले की, “तणावमुळे आणि खान-पानामुळे एक महिन्यात माझे वजन 8 किलो वाढले आहे. मागील सोमवारपासून मी माझ्या रूटीनमध्ये परतलो आहे. हे वेदनादायी आहे, पण मी पुनरागमन करेल.” हे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.

वडिलांसोबत कसे होते गश्मीरचे नाते
गश्मीरने वडिलांसोबतच्या नात्यावरही भाष्य केले. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, “मी फक्त हे सांगू इच्छितो की, मागील 20 वर्षांपासून त्यांनी त्यांच्या मर्जीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.

एक कुटुंब म्हणून हे स्वीकारण्याव्यतिरिक्त आम्ही काहीच करू शकत नाही. कारण, तुम्ही कोणालाही असे काही करण्यासाठी प्रवृत्त करू शकत नाही, जे त्यांना करायचे नसते.”

अभिनेत्याचे काम
गश्मीर महाजनी याच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत अनेक मराठी सिनेमात काम केले आहे. तो अखेरचा ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमात दिसला होता. याव्यतिरिक्त तो सध्या ‘तेरे इश्क में घायल’ या टीव्ही मालिकेत दिसत आहे.

हेही वाचा-
रवींद्र महाजनी यांच्या लेकीबद्दल माहित आहे का? जाणून घ्या कशी आहे गश्मीरची ‘छोटी आई’
रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन ‘हे’ कलाकार आपल्या भावा- बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा