Saturday, April 20, 2024

‘त्याच जुन्या बायका…’, प्रसिद्ध दिग्दर्शकाने नवीन वर्षाच्या दिल्या विचित्र शुभेच्छा; वाचून शॉकच बसेल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे नाव सध्या खूपच चर्चेतमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षापासून राम वर्मांनी इंडस्ट्रीमधील अनेक गाजणारे चित्रपट दिले, त्याशिवाय त्यांच्या सोबत काम करण्यासाठी अनेक कालाकार संधीची वाट पाहायचे मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांना  ट्रोलिंगचाही सामना कारावा लागला. मात्र, आता सर्वत्र नवीन वर्षाचा जल्लोष सुरु आहे यामध्येच रामू यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा हटके पद्धतीने दिल्या आहेत.

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी शनिवार (दि, 31 डिसेंबर) रोजी म्हणजेच 2022 च्या शेवटच्या वर्षी त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन सोशल मीडियावर हटके पद्धतीने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्याला पाहून अनेकांचे हसून हसून पोट दुखेल. सध्या सोशल मीडियावर रामूजिंच्या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलेल्य ट्वीटमध्ये लिहिले की, “31 डिसेंबर पर्तय ज्या अडचनी होत्या त्या 1 जानेवारी 2023 रोजी उठल्यानंतरही राहाणार आहेत, कारण आजही तुम्ही त्याच जुन्या बायको किंवा नवऱ्यासोबत असणार आहात. #happysameyear. रामूजींच्या या ट्वीटने सोशल मीडियावर क्रेज केली असून अनेक चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. त्याशिवाय अनेकांनी त्यांना ट्रोलही केले आहे.

राम वर्मा हे गॅंगस्टर सरख्या चित्रपटांसाठी जास्त ओळखले जातात. त्यांनी आजपर्यत बॉलिवूडमधील ‘सत्या’, ‘आग’, ‘शिवा’, ‘कंपनी’, ‘रक्तांचल’, ‘डिपार्टमेंट’ सारख्या अनेक गाजणारे गॅंगस्टर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सध्या अभिनेता साउथ चित्रपटांमध्ये जास्त मग्न असतात. त्यांनी बॉलिवूड शिवाय अनेक साउथ चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘जंगल’, आणि भूतसारख्या चित्रपटांसाटी त्यांना बेस्ट दिग्दर्शनाचा अवॉर्डही मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आता बॉक्स ऑफिस हादरणार! 2023मध्ये पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार ‘या’ जोड्या, यादी पाहाच
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्ताळलेल्या अवस्थेत दिसला आलियाचा रणबीर, ‘या’ सिनेमाचे पोस्टर रिलीज

हे देखील वाचा