Tuesday, January 31, 2023

आता बॉक्स ऑफिस हादरणार! 2023मध्ये पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार ‘या’ जोड्या, यादी पाहाच

बॉलिवूडमध्ये प्रत्येक वर्षी नवनवीन जोड्या रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज असतात. काही जोड्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात, तर काहींना ते जमत नाही. अशात 2022 संपून 2023 वर्षाची सुरुवात झाली आहे. आता या वर्षात अनेक नवीन जोड्या पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. तसेच, चाहतेही त्यांच्या आवडत्या जोड्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. चला तर जाणून घेऊया अशाच काही नवीन जोड्यांबद्दल, ज्या 2023मध्ये रुपेरी पडद्यावर डंका वाजवताना दिसतील.

यावर्षी रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या नवीन जोड्या
प्रभास आणि क्रिती सेनन- आदिपुरुष
ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘आदिपुरुष‘ (Adipurush) या सिनेमात साऊथ सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनन (Prabhas And Kriti Sanon) ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत, तर क्रिती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारणार आहे. हा पॅन इंडिया सिनेमा जून, 2023मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

सारा अली खान आणि विकी कौशल- नाव निश्चित नसलेला सिनेमा
अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल (Sara Ali Khan And Vicky Kaushal) ही नवीन जोडी लवकरच नाव निश्चित नसलेल्या सिनेमात ऑन स्क्रीन झळकणार आहेत. या सिनेमाची शूटिंग मध्यप्रदेश राज्याच्या इंदोर येथे करण्यात आली आहे. मात्र, आता निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये.

ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण- फायटर
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांच्या ‘फायटर’ (Fighter) सिनेमात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण (Hrithik Roshan And Deepika Padukone) पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या ऍक्शन ड्रामा सिनेमात ऋतिक भारतीय वायू सेनेच्याय पायलटची भूमिका साकारणार आहे, तर अनिल कपूर वॉर स्टारच्या संरक्षकाची जबाबदारी पार पाडताना दिसतील. मात्र, हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता ताणून धरावी लागेल. कारण हा सिनेमा 2024मध्ये रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

अलाया एफ आणि राजकुमार राव- श्री
नुकतेच अभिनेत्री अलाया एफ हिने तिचा एक फोटो शेअर करत ‘श्री’ (Shree) सिनेमाची शूटिंग सुरू केल्याची माहिती दिली होती. या सिनेमात अलाया एफ आणि राजकुमार राव (Alaya F And Rajkummar Rao) दिसणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, हा सिनेमा अंध उद्योजक श्रीकांत बोला यांचा बायोपिक असणार आहे.

दिशा पटाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा- योद्धा
बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत दिशा पटाणी हिच्या नावाचा समावेश होतो. आता दिशा पटाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Disha Patani And Sidharth Malhotra) एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ही जोडी पहिल्यांदाच ‘योद्धा’ (Yodha) सिनेमात झळकणार आहे. या सिनेमासाठी दिशाने खूप मेहनतही घेतली आहे. (new pair on screen in 2023 prabhas kriti sanon to hrithik roshan deepika padukone see list)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Bye Bye 2022| कायम आठवणीत राहतील असे शेफाली शाहचे 5 संस्मरणीय भूमिका, पाहाच यादी
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्ताळलेल्या अवस्थेत दिसला आलियाचा रणबीर, ‘या’ सिनेमाचे पोस्टर रिलीज

हे देखील वाचा