‘दीपिकाला पहिल्यांदा पाहिल्यावर जाणवले की, भविष्यात ही…’, रणबीरने मुलाखतीत केला होता खुलासा


सिनेसृष्टीमध्ये अनेक जोड्या तयार होतात आणि अनेक तुटतात. मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक जोड्या आहेत, ज्या पाहून प्रेक्षकांना वाटायचे की, या जोडी आयुष्यभर सोबत राहतील. मात्र, त्या जोड्या काही काळातच तुटल्या. अगदी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूरपासून जॉन अब्राहम, शाहिद कपूरपर्यंत अनेक कलाकारांचे अफेअर खूप गाजले. आकंठ प्रेमात बुडालेल्या या जोड्या अचानक वेगळ्या झाल्या आणि फॅन्सला मोठा धक्का बसला.

बॉलिवूडमधील अशाच एका जोडीचे अफेअर आणि त्यांचे ब्रेकअप प्रचंड गाजले आणि ती जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण. जवळपास दोन वर्ष हे दोघे नात्यात होते.

मात्र, आता या दोघांचे ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला. आज हे दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्न केले, तर रणबीर देखील आलियासोबत नात्यात आहे. आता तुम्ही म्हणाल असे असूनही तुम्ही रणबीर दीपिकाबद्दल का बोलताय?

रणबीरने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की, त्याने जेव्हा पहिल्यांदा दीपिकाला पाहिले, तेव्हा त्याच्या डोक्यात पहिला विचार काय आला होता? त्याने सांगितले होते की, “दीपिकाला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा ती ‘ओम शांती ओम’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. योगायोगने मीही त्याच स्टुडिओमध्ये ‘सांवरिया’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. जेव्हा मी स्टुडिओमधून बाहेर पडत होतो, तेव्हा दीपिका शूटसाठी तयारी करून माझ्या शेजारून गेली. तिला पाहताच मला जाणवले की, ही भविष्यात मोठी कलाकार होणार. ती त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्यादिवसानंतर आज मी जेव्हा जेव्हा दीपिकाला बघतो, तेव्हा मला तिच्यात अधिक चांगला बदल झालेला दिसतो.”

या भेटीनंतर पुढच्या काही तासातच रणबीरने दीपिकाचा नंबर मिळवला आणि तिला फोन देखील केला. या दोघांनी त्यांचा दुसरा सिनेमा ‘बचना ए हसीनों’मध्ये सोबत काम केले. या सिनेमाच्या आऊटडोर शूटिंग दरम्यान इटलीमध्ये हे दोघे जवळपास २ महिने एकत्र होते. त्याच वेळेस ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दीपिका या नात्यात खूपच सिरीयस होती. मात्र, रणबीरमुळे त्यांचे नाते संपुष्टात आले.

रणबीरला धोका देताना दीपिकाने स्वतः पाहिले आणि तिने हे नाते संपवले. माध्यमातील वृत्तानुसार, दीपिकासोबत नात्यात असूनही रणबीर कॅटरिना कैफला डेट करत असल्याने दीपिकाने नाते तोडले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल १२’मधील अमित कुमार वादावर अभिजीत भट्टाचार्य यांचा शोला पाठिंबा; म्हणाले, ‘त्यांनी कॅमेऱ्यासमोर…’

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.