Friday, March 29, 2024

नवाजुद्दीन सिद्दीकी अन् तमन्ना भाटियाच्या रोमँटिक अंदाजाला चाहत्यांची तूफान पसंती; एकाच दिवसात गाण्याला मिळाले २८ लाखांपेक्षा अधिक हिट्स

‘बोले चुडियां’ या आगामी चित्रपटाचे आणखी एक गाणे रिलीझ झाले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तमन्ना भाटिया यांच्यावर चित्रीत ‘रेहगुझर’ हे नवीन गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात नवाजुद्दीन सिद्दीकीचा अतिशय रोमँटिक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तमन्ना भाटिया यांच्या आगामी चित्रपटाचे हे नवीन गाणे चाहत्यांकडून खूपच पसंत केले जात आहे. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून चाहते व्हिडिओवर भरभरून प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तमन्ना भाटियाचे ‘रेहगुझर’ गाणे रिलीझ झाल्यानंतर, एकाच दिवसात २८ लाखांहूनही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या अगोदर चित्रपटातील ‘स्वॅगी चुडियां’ हे गाणे रिलीझ झाले होते. या गाण्यालाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.

तमन्ना भाटिया नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चुडियां’ या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कहाणी एका छोट्याशा गावात राहणाऱ्या, एका प्रेमळ जोडप्याच्या लव्हस्टोरीवर आधारित आहे. विशेष म्हणजे, नवाजुद्दीन सिद्दीकी, तमन्ना भाटिया आणि राजपाल यादव एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकीचा पहिला संगीत व्हिडिओ रिलीझ झाला होता. ‘बारिश की जाए’ गाण्याच्या या व्हिडिओमध्ये तो सुनंदा शर्मासोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. गायक बी प्राकने हे गाणे गायले आहे, तर प्रसिद्ध गीतकार जानी यांनी हे गाणे लिहिले आहे.

तमन्ना भाटियाबद्दल बोलायचे झाले, तर ती दक्षिणी चित्रपटसृष्टीची एक नामांकित अभिनेत्री आहे. प्रभाससोबत ‘बाहुबली’ चित्रपटात काम केल्यानंतर, ती तिथल्या सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. तमन्नाने बॉलिवूडच्याही काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘हिम्मतवाला’, ‘एंटरटेनमेंट’ आणि ‘हमशकल्स’ अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री दिसली आहे. तथापि, तिला दक्षिणच्या चित्रपटांमधूनच खरी ओळख मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नृत्याने अंधार आणि वेदनाविरुद्ध लढण्यास मिळते मदत’, म्हणत अभिनेत्री संदीपा धरने नृत्य दिनानिमित्त केला आयुष्यातील मोठा खुलासा

-रेमो डिसूजाने पत्नी लिजेलसोबत केला मजेशीर व्हिडिओ शूट, पाहून तुम्हीही खदखदून हसाल

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

हे देखील वाचा