Tuesday, May 28, 2024

ठरलं तर! अनेक वर्ष डेट केल्यानंतर अभिनेत्री ऋचा चढ्ढा आणि अली फजल बांधणार लग्नगाठ

सध्या मराठी तसेच हिंदी सिने जगतात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. अलिकडेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. त्यानंतर आता हिंदी सिने जगतातील अभिनेत्री ऋचा चढ्ढाही (Richa Chadha) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. याबद्दलचा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने अलीकडेच अली फजलसोबतच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, “जे तिच्यापेक्षा लहान आहेत त्यांचेही लग्न झाले आहे, पण तिच्या लग्नाला उशीर होत आहे. तिने असेही सांगितले की ती या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये तिच्या प्रियकराशी म्हणजेच अभिनेता अली फजलशी लग्न करणार आहे. अली फजल आणि ऋचा चढ्ढा दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता अभिनेत्रीने लवकरच आम्ही विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती दिली आहे.

ऋचाने एका मुलाखतीत सांगितले की, “जेव्हाही आम्ही लग्न करण्याचा विचार करायचो तेव्हा कोविडची नवी लाट यायची. 2020 मध्ये, आम्ही लग्नासाठीही जागा बुक केली होती, परंतु कोविडची पहिली लाट आली आणि लॉक डाऊन पडले. आम्ही गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा नियोजन केले होते, पण भारतात पुन्हा दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिसायला लागला. त्यामुळे पुन्हा लग्न पुढे ढकलले गेले.” याआधी अभिनेता अली फजलनेही त्यांच्या लग्नाबद्दलचा खुलासा केला होता.

अली फजलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, “आम्ही लग्न करण्यासाठी खुप उत्सुक आहोत. हे खूप दिवसांपासून लांबणीवर पडले आहे. पहिल्यांदा लॉकडाऊनमुळे उशीर झाला आणि या वर्षी दुसऱ्या लाटेमुळे. २०२० मध्ये आम्हा दोघांना आमच्या प्रोजेक्ट्सचे शूटिंग पूर्ण करायचे होते, त्यामुळे आम्हाला वेळ मिळू शकला नाही. मार्च 2022 मध्ये आमचं लग्न होऊ शकतं, पण मी त्याबद्दल आत्ताच काही सांगू शकत नाही.”

दरम्यान रिचा आणि अली दोघेही ‘फुकरे ३’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर अली फजल ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. यात पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी शर्मा, कुलभूषण खरबंदा, विजय वर्मा आणि ईशा तलवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा –

डिमांड तर बघा! रकुल प्रीत सिंगला करायचे आहे रोमँटिक सिनेमात काम, शाहरुख खानला मानते आदर्श

बाबो! अनन्या पांडेला आवडतो ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता म्हणाली, ‘तु खुप सेक्सी आहेस, पण’

न्यूड फोटोशूट करताना काय होती रणवीर सिंगची अवस्था?, फोटोग्राफरने सांगितल्या कॅमेरामागील गोष्टी

हे देखील वाचा