Thursday, July 18, 2024

जिनिलीया पुन्हा गरोदर असल्याच्या अफवांवर रितेशने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला अजून 2-3 मुलं…’

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडीयावर चर्चेत असतो. त्याची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलीया देशमुख देखील सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या रितेश आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण अंदाज लावत होते की ही अभिनेत्री पुन्हा एकदा आई होणार आहे. आता रितेश देशमुखने या बातमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधमध्ये रितेश (Riteish Deshmukh)आणि जिनिलीया हातात हात घालून कार्यक्रमासाठी गेलेले दिसत आहेत. यावेळी जिनिलीयाने जांभळ्या रंगाचा एक झकास वनपीस परिधान केला आहे. तिच्या या वनपिसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ती पती रितेश देशमुखसोबत एका कार्यक्रमात दिसली होती.

यादरम्यान, जेव्हा दोघेही कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी आले. तेव्हा लोकांनी त्यांना पाहिले आणि अंदाज लावला की ही अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होणार आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने पोज देताना पोटावर हात ठेवला होता आणि कार्यक्रमात रितेश तिची काळजी घेताना दिसत होता. अशा स्थितीत जिनिलीया पुन्हा एकदा आई होणार असल्याचा अंदाज लोक बांधू लागले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या सगळ्यात आता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सोमवारी एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, त्याने त्याची पत्नी जिनिलीयाच्या गरोदरपणाबद्दल अंदाज लावणाऱ्या काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जिनिलीया प्रेग्नंट आहे का?” ही पोस्ट शेअर करताना रितेशने लिहिले की, ‘मला अजून २-३ मुलं चालतील पण, दुर्दैवाने ही बातमी खोटी आहे.’ सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. (Riteish Deshmukh reacts to the rumors of Genelia being pregnant again)

अधिक वाचा-
राष्ट्रगीताचा अपमान केल्याने करीना कपूर ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘जरा लाजा वाटुद्या…’
ए. आर. रहमान यांच्या कॉन्सर्टमध्ये मोठा गोंधळ, लोकांची गैरसोय आणि चेंगराचेंगरी झाल्याने गायक आणि टीमवर कारवाई

हे देखील वाचा