अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा ‘वेड‘ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरशः ‘वेड’च लावले. बऱ्याच काळाने ‘वेड’च्या निमित्ताने मराठी बॉक्स ऑफिसवर वर्दळ पाहायला मिळाली. 2002 साली रितेश आणि जिनिलिया यांनी ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमात पहिल्यांदा सोबत काम केले. त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी ते पुन्हा एकदा ‘वेड’च्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसले. या 20 वर्षांमध्ये त्यांनी एकत्र बरेच काम केले. त्यांचा हा 20 वर्षांचा प्रवास सेलिब्रेट करण्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रितेश आणि जिनिलियाने मीडियासोबत मनमोकळा संवाद साधत त्यांच्या सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने रितेशने सर्वांसमोर जिनिलियासाठी एक खास उखाणा देखील घेतला, आणि यामागची एक मजेशीर स्टोरी देखील सांगितली. रितेश म्हणाला, “1995 साली मी माझ्या काही मित्रांसोबत गावी क्रिकेट खेळायचो. तेव्हा ग्रामीण भागात क्रिकेट सामने खेळवले जायचे त्यात एक पर्सनल कॉमेंटेटर असायचा. त्याचे लग्न होते आणि आम्हाला लग्नाचे आमंत्रण होते. त्या लग्नात केवळ 30/40 लोकं होते त्या लग्नात जो उखाणा घेतला गेला तोच आज मी घेणार आहे.” यानंतर रितेशने सर्वच पुरुषांचा आवडीचा उखाणा घेतला रितेश म्हणाला, ‘भाजीत भाजी मेथीची जिनिलिया माझ्या प्रीतीची.’
तत्पूर्वी रितेश आणि जिनिलिया यांच्या ‘वेड’ या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिनिलियाचा हा पहिलाच मराठी सिनेमा असल्याने तिचे जोरदार कौतुक होत आहे. या सिनेमात जिनिलियाने ‘श्रावणी’ ही भूमिका साकारली असून तिची ही भूमिका आणि तिचे सर्वच लोकं खूपच कौतुक करत आहे. या सिनेमातील गाणी देखील तुफान गाजत आहे.(riteish deshmukh took marathmola ukhana)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या गोष्टी खूप विचित्र आहेत’, विवेक ओबेरॉयबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सलमानने दिले होते उत्तर
‘पडद्यावरचे विश्व फारच वेगळे, भन्नाट’, मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून उलगडले मनोरंजनविश्वात येण्यामागचे रहस्य