Friday, March 29, 2024

‘माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही, तर…’; पत्नीच्या वाढदिवशीच रितेशने ट्वीट करत सांगितलं खरं नाव

मराठीमध्ये अनेक शब्दांचे उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारले जातात. कधी कधी काही शब्दांचे उच्चार खूपच विचित्र तर, कधी मजेशीर असतात. प्रत्येक व्यक्ती त्याच्या सोयीने त्या त्या शब्दांचे उच्चार करत असतो. बॉलिवूडमधील कलाकारांची नावे देखील वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारली, लिहिली जातात. जिनिलिया डिसुझा देखील बऱ्याचदा अशा अनुभवांना सामोरी जाते. त्यामुळे अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या बायकोचे खरे नाव सांगितले आहे.

आज जिनिलिया तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने रितेशने त्याच्या बायकोचे अभिनेत्री जिनिलियाचे खरे नाव जाहीर केले आहे. रितेशने एक ट्वीट करत त्याच्या बायकोचे नाव सांगितले आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या बायको चे नाव ‘जिनिलिया’ आहे… जेनेलिया नाही.’ जिनिलियाचे खरे नाव सांगितल्यावर सोशल मीडियावर रितेशच्या ट्वीटला अनेक मजेशीर रिप्लाय येत आहे.

यासोबतच रितेशने त्याच्या लाडक्या बायकोला शुभेच्छा देताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको, माझ्यासाठी या जगातील सर्वात स्पेशल व्यक्ती.” या व्हिडिओमध्ये या दोघांचे काही प्रेमळ क्षण एकत्र केले आहे. जिनिलिया डिसूझाचा जन्म मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला. तिने हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

रितेश आणि जिनिलिया यांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान झाली. त्यानंतर काही काळाने त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि पुढे जाऊन फेब्रुवारी २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. रितेश आणि जिनिलिया बॉलिवूडमधील सर्वात गोड कपल म्हणून ओळखले जाते. त्यांची तुफान लोकप्रियता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा