रितेश-जेनेलियाने टाटा हॉस्पिटलमध्ये जात साजरा केला आंतरराष्ट्रीय बालकर्करोग दिन, पाहा फोटो


रितेश देशमुख मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असणारा अभिनेता. रितेशने एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातून पुढे येत हिंदी सिनेसृष्टीमधे त्याचे स्थान बळकट केले. आर्किटकचेरचा विद्यार्थी असूनही त्याने केवळ प्रतिभेच्या जोरावर ह्या क्षेत्रात यश संपादन केले.

रितेश हा सिनेमांसोबतच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सहभाग घेत असतो. या समाजाला आपलेही काही देणे आहे, या भावनेतून तो नेहमी या समाजासाठी अनेक उपक्रम राबवत असतो. नुकतेच रितेशने २० व्या आंतरराष्ट्रीय बालकर्करोगाच्या निमित्ताने मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये जेनेलियासोबत भेट दिली.

या भेटीदरम्यान रितेश आणि जेनेलियाने तेथील कॅन्सरवर उपचार घेत असणाऱ्या लहान मुलांसोबत बराच वेळ व्यतीत केला. विशेष म्हणजे रितेश-जेनेलियाने मुलांसोबत डान्स केला, त्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारल्या, त्यांना खेळणी आणि खाऊचे वाटप केले, अनेक खेळ खेळले. रितेशने या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

हे फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले, “आज आंतरराष्ट्रीय बालकर्करोगाच्या निमित्ताने आम्ही टाटा हॉस्पिटला भेट देत हा दिवस येथील चिमुकल्यांसोबत साजरा केला. या भेटीचा उद्देश हा बालकर्करोगाबद्दल जनजागृती हा देखील होता. बालकर्करोग हा योग्य उपचार आणि मार्गदर्शन घेतल्यास बरा होऊ शकतो. आज मला आणि जेनेलियाला या हॉस्पिटलमध्ये येऊन या लहान मुलांसोबत वेळ घालवता आल्याने आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो.”

रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हाऊसफुल्ल ४ हा शेवटचा प्रदर्शित झालेला त्याचा सिनेमा होता. पुढील वर्षी त्याचा बच्चन पांडे हा सिनेमा येत आहे. जेनेलियाने २०२०मध्ये आलेल्या इट्स माय लाईफ सिनेमानंतर कोणत्याही सिनेमात काम केलेले नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-
‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांना आहेत जीवघेणे आजार, तरीही अव्याहतपणे करतायत आपलं मनोरंजन! पाहा यादी 
सिंघमच्या काव्याला झालाय जीवघेणा आजार, करियर सांभाळत काजल अग्रवाल रोज लढतेय या आजाराशी
रामायणातील मेघनादची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे या गंभीर आजाराने झाले होते निधन; राजेश खन्ना यांच्याशी केली जायची तुलना
अजय देवगण ते विद्या बालन, या पाच सेलिब्रिटींनी आहेत दुर्धर आजार! तरीही अखंडपणे करतायत आपलं मनोरंजन!

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.