Saturday, April 20, 2024

न बोलताच मीस्टर बीन यांनी केलं जागावर राज्य, आज आहेत कोट्यावदी संपत्तीचे मालक

कॉमेडी जगामधील दिग्गज अभिनेता रोवन सेबेस्टियन एटकिंसन यांनी न बोलता जगभरातील अनेक प्रेक्षकांवर राज्य केलं आहे. रोवन हे अभिनेता शिवाया लेखक, कॉमेडियन आहेत. आजही त्यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा मिस्टर बीन याच नावाने जास्त ओळखलं जातं. मिस्टर बीन हे नाटक लहान वयोगटातीलच नाही तर तरुन आणि वृद्ध प्रेक्षाकांच्या पसंतीस उतरलं आहे. मात्र, अभिनेत्याला ही भूमिका साकारण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. कारण या भूमिकेची पूर्ण जबाबदारी एकट्या कलाकरावर होती.

हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता रोवन सेबेस्टियन एटकिंसन (Rowan Atkinson) आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. रोवन यांचा जन्म 6 जानेवारी 1955 साली इंग्लडमधील कॉन्सेट डरहम काउंटीमध्ये झाला होता. रोहन यांनी आपलं बालपन तिथेच काढले. अभिनेत्याला एकूण 4 भाऊ असूम त्यापैकी सर्वात लहान रोवन होते. त्यांचे वडील एरिक एटकिंसन शेतकरी आणि कंपनीमधील सुपरव्हायजर होते. रोवन यांनी ऑक्सफोर्डच्या क्वींस कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. याच कॉलेमध्ये अभिनेत्याचे वडीलही शिकले होते. मीस्टर बीन यांना ट्रक चालवण्याचा छंद आहे. त्यामुळे अभिनेता आजही ट्रक ड्राइविंगच लायसन्स ठेवत असतात. रोवन यांचे आयुष्य खूप चांगलं आहे, जेवढं मिस्टर बीन बनून प्रेक्षकांना हसवत असतात तेवढच ते खऱ्या आयुष्यामध्ये देखिल खुश अंदाजात आणि सगळ्यांना हसवत असतात. त्याशिवाय अभिनेता आपल्या मित्र परिवारातही सगळ्यांचे लाडके आहेत.

रोवन यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1978 साली ‘द अटकींसन पीपल’ या कॉमेडी सिरिजपासून केली होती. त्यावेळी अभिनेता बीबीसी रेडिओ 3 साठी काम करत होते. यानंतर अभिनेत्याने 1979 साली कॅन लाफ्टरमध्ये काम केले आणि त्याच वर्षी त्यांनी ‘नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज’ या कॉमेड वेबसिरिजमध्येही काम केले होते. रोवन यांनी मिस्टर बीन शिवाय ‘ब्लॅकेडर’, ‘द सीक्रेट पुलिसमॅन बॉल्स’, आणि ‘द थिन ब्लू लाइन नाम’ सारख्या टीव्ही मालिकेतही काम केले आहे.

रेवन एटकिंसन हे ब्रिटेनमधील सगळ्यात जाास्त श्रीमंत लोकांमध्ये त्यांची मोजनी केली जाते. त्याशिवाय मोठ्या कलाकारातही अभिनेत्याचे नवान घेतले जाते. मिस्टर बीन यांचा लंडनलामधील आलिशान बंगला असून त्याची किंमत कोट्यावदी आहे. त्याशिवाय अभिनेत्याला कारचाही खूप छंद आहे. त्यांच्याकडे एफ1 कार आहे ज्याची मार्केट व्हॅल्यु 80 ते 100 कोटी रुपये आहे. रोवन यांना गाड्यांचा छंद असल्यामुळे त्यांच्याकडे जगातील सगळ्यात माहागड्या गाड्यांच कलेक्शन आहे.

मिस्टर बीन यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी युनायटेड किंगडमची माहाराणी यांनी 2013 साली ‘कमांडर ऑफ द मोस्ट एक्सीलेंट’ खिताबही दिला होता. माध्यमातील वृत्तानुसार रोवन एटकिंस आठ हजार कोटी संपत्तीचे मालक आहेत. अभिनेताच्या लोकप्रिय कार्यक्रमाने तब्बल 5 वर्ष प्रेक्षकांवर राज्य केले असून आजही हा कार्यक्रम लोक आवडीने पाहात असतात.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमृता फडणवीस यांच्या ‘आज मैं मूड बना लिया’ या नवीन गाण्याचा टीझर प्रदर्शित
हिना खानचा नवीन वर्षाचा नवीन लूक, परदेशात करतेय एन्जॉय

हे देखील वाचा